दागिने चोरणाऱ्या महिलांच्या हातात बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:30 IST2020-12-31T23:40:39+5:302021-01-01T00:30:48+5:30
नाशिक : येथील वृंदावननगर भागात बनावट महिला ग्राहकांनी खरेदीच्या बहाण्याने प्रवेश करत दागिने बघताना ते हातचलाखीने लांबविल्याची घटना घडली होती. आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्याचा तपास करत औरंगाबादमधून दोघा संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दागिने चोरणाऱ्या महिलांच्या हातात बेड्या
नाशिक : येथील वृंदावननगर भागात बनावट महिला ग्राहकांनी खरेदीच्या बहाण्याने प्रवेश करत दागिने बघताना ते हातचलाखीने लांबविल्याची घटना घडली होती. आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने या गुन्ह्याचा तपास करत औरंगाबादमधून दोघा संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आडगाव पोलीस ठाण्यात २५ डिसेंबर रोजी तीन अज्ञात महिलांनी प्रवेश करत दुकानामधील दोन चांदीच्या तोरड्या व तोरडी जोड आणि अंगठी असे एकूण ९ हजार ३५० रुपयांचे दागिने लांबविले होते. याप्रकरणी आर.के. ज्वेलर्सच्या मालकांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला गती दिली होती.
औरंगाबाद येथील रेल्वेस्थानकाजवळील झोपडपट्टीतून एका महिलेला तर दुसऱ्या महिलेला शिरूर येथून ताब्यात घेण्यात आले. या दोघींची झडती घेतली असता त्यांच्याकडून चोरी केलेले दागिने हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे.