इगतपुरीत घराच्या इमारतीचा अर्धा भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 01:57 IST2022-06-02T01:57:06+5:302022-06-02T01:57:44+5:30

इगतपुरी येथील नवा बाजार परिसरातील अस्लम खान इनामदार यांच्या राहत्या घराच्या इमारतीचा अर्धा भाग मंगळवारी रात्री कोसळला. रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली

Half of the house building in Igatpuri collapsed | इगतपुरीत घराच्या इमारतीचा अर्धा भाग कोसळला

इगतपुरी येथे नवा बाजार परिसरात इमारतीची कोसळलेली भिंत.

इगतपुरी : येथील नवा बाजार परिसरातील अस्लम खान इनामदार यांच्या राहत्या घराच्या इमारतीचा अर्धा भाग मंगळवारी रात्री कोसळला. रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटना घडत असताना लहान मुले बाहेर खेळत होती. माती पडत असताना घरातील महिलेने प्रसंगावधान राखत मुलांना तत्काळ बाजूला केले आणि वरील मजल्यावर काम करणाऱ्या महिला गॅस बंद करून खाली आल्या. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेत २ कूलर, वॉशिंग मशीन, टीव्ही, कपाट संसारोपयोगी साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रे असे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आह

Web Title: Half of the house building in Igatpuri collapsed