वाडीवऱ्हे : अचानक आलेल्या बेमोसमी पावसाने वाडीवऱ्हेच्या आठवडे बाजारात नागरिकांची आणि व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली. या पावसामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान देखील झाले असून शेतीमाल व द्राक्ष पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.वाडीवऱ्हे आणि परिसरात गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाट व जोरदार वादळासह पावसाला सुरुवात झाली. पूर्व भागातील साकूर परिसरात गारपीट झाल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. काढणीला आलेल्या गहु, हरभरा या रब्बी पिकांबरोबरच द्राक्ष,कांदा, टोमॅटो आणि भाजीपाला पिकांचेदेखील नुकसान झाले. तब्बल एक तास मुसळधार पाऊस आणि त्यांनतर काही वेळ रिमझिम पाऊस सुरु होता. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
वाडीवऱ्हे परिसरात गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:40 IST
वाडीवऱ्हे : अचानक आलेल्या बेमोसमी पावसाने वाडीवऱ्हेच्या आठवडे बाजारात नागरिकांची आणि व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली. या पावसामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान देखील झाले असून शेतीमाल व द्राक्ष पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
वाडीवऱ्हे परिसरात गारपीट
ठळक मुद्देशेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.