गुणवंत विद्यार्थ्यांचा पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेतर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:06 IST2019-06-25T18:05:33+5:302019-06-25T18:06:07+5:30
पिंपळगाव बसवंत : येथे परिसरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीनी एम. पी. एस. सी, एस. एस. सी तसेच एच. एस. सी परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना पिंपळगाव ग्रामपंचायत सरपंच अलका बनकर, उपसरपंच रुक्मिणी मोरे, संजय मोरे, गणेश बनकर आदिंसह ग्रामपंचायत कर्मचारी, पालक व विद्यार्थी.
पिंपळगाव बसवंत : येथे परिसरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीनी एम. पी. एस. सी, एस. एस. सी तसेच एच. एस. सी परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पिंपळगावच्या विद्यमान सरपंच अलका बनकर, उपसरपंच रुख्मिणी मोरे, पोलीस निरीक्षक संजय महाजन, मंडळ अधिकारी नीलकंठ उगले, ग्रामपंचायत सदस्य सोनाली विधाते, संजय मोरे, गणेश बनकर, विश्वास मोरे, सुहास मोरे, सुहास भोसले आदींच्या उपस्थित हा गुणगौरव सोहळा पार पडला.
ग्रामपंचायत मधील अभ्यासिकेत अभ्यास करून एम. पी. एस. सी. परिक्षेत विजय झुर्डे व मंगेश खैरनार या दोन्ही विद्यार्थांनी कर सहाय्यक व मंत्रालय लिपिक परीक्षेत यश मिळविले. या दोन्ही विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.
भीमाशंकर इंग्लिश मीडियम स्कूल येथील काजल सोनी, मिताली भटेवरा, सानिका कोठुळे, सिद्धार्थ बागुल, प्रथम निफाडे, यश रुईकर, ऋ चा मोरे, सानिका पाटील, कुणाल जाधव, तेजस घुगे, चैतन्य जाधव. कन्या विद्यालय शाळेतील शितल कदम, प्रेरणा वाघ, रोशनी अमृतकर. कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील सोनल मोरे, रेणुका जाधव, अंकिता भंडारे, श्रद्धा गोसावी, धनश्री देशमुख, दीपक उगले, चैतन्य पाटील, तेजस महाले, आदित्य गटकळ, किरण राठोड, मोनाली साळे, पूजा साळे, शुभांगी महाले, वैष्णवी ढोमसे, प्राजक्ता वाघ आदींचा पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या वतीने प्रमाणपत्र गुलाब पुष्प व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक मोरे, सुरेश गायकवाड, अंकुश वारडे, बापू कडाळे, दीपक विधाते, अग्निशमन विभागाचे प्रमुख सुनील मोरे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होते.