गारपिटीने केली द्राक्षांची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 19:03 IST2021-03-21T19:02:44+5:302021-03-21T19:03:45+5:30
पिंपळगाव बसवंत : द्राक्ष माल पक्वा होत असताना वादळी वारा व पाऊस अन् गारपिट झाल्याने अक्षरशः द्राक्षांचे घड तुटून पडले. शनिवारी (दि.२०) झालेल्या गारपिटीने द्राक्षांची पूर्णपणे नासाडी झाली, तर तर खुडणी केलेल्या द्राक्षांना व्यापारी घेण्यास देखील तयार नसल्याने तोडणी केलेला द्राक्ष मळा उन्हात वाळत घालण्याची नामुष्की शेतकर्यांवर आली आहे.

गारपिटीने नुकसान झालेली द्राक्षे वाळत घालताना शेतकरी.
पिंपळगाव बसवंत : द्राक्ष माल पक्वा होत असताना वादळी वारा व पाऊस अन् गारपिट झाल्याने अक्षरशः द्राक्षांचे घड तुटून पडले. शनिवारी (दि.२०) झालेल्या गारपिटीने द्राक्षांची पूर्णपणे नासाडी झाली, तर तर खुडणी केलेल्या द्राक्षांना व्यापारी घेण्यास देखील तयार नसल्याने तोडणी केलेला द्राक्ष मळा उन्हात वाळत घालण्याची नामुष्की शेतकर्यांवर आली आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज घेऊन भविष्यात लाख रुपये उत्पादन होणार या आशेवर कष्ट करीत असताना अचानक आलेल्या गारपिटीने व अवकाळी पावसाच्या थेंबाने अवघ्या काही क्षणात उराशी बाळगून असलेल्या स्वप्नांचा चक्काचूर करत लाखोचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्याचे कधी हजारावर आले कळलेच नाही. या जोरदार गारपिटीने परिपक्व झालेले द्राक्ष, सोंगणीसाठी आलेले गहू हरभरा व पालेभाज्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे स्वप्न उध्वस्त....
द्राक्ष पिकासाठी काढलेले कर्ज, थकलेले लाईट बिल, उसनवारी पैसे, औषध बिले, दुकानदारांची भरमसाठ उधारी आदी संकटे दारी ठाकलेले असताना त्यातून सावरून मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, घर आदी कर्तव्य पूर्ण करायचे होते, मात्र जोरदार झालेल्या गारपिटीने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे स्वप्न अक्षरशा उद्ध्वस्त करून टाकले आहे.