राजापूर येथे रानडुकरांचा हैदोस; मका पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:17 IST2020-08-23T21:22:41+5:302020-08-24T00:17:01+5:30

राजापूर : परिसरात रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.

Haidos of cows at Rajapur; Damage to maize crops | राजापूर येथे रानडुकरांचा हैदोस; मका पिकांचे नुकसान

राजापूर येथे रानडुकरांचा हैदोस; मका पिकांचे नुकसान

ठळक मुद्देमुगाला फुटले कोंब

लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : परिसरात रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या मका पिकात रानडुकर हैदोस घालतात. मका पिक पाडून मकाच्या बिटया खाऊन टाकतात. रानडुकरांच्या या त्रासाला शेतकरी वर्ग वैतागले आहेत. रानडुकरांच्या भितीने शेतकरी रात्री मकाच्या शेतात जात नाहीत. मका पिकाच्या पेरणी वेळेस व नंतर बिटया आल्यानंतर रानडुकरांचा त्रास जास्त होतो.
मका सोंगणीसाठी एक ते दीड मिहना बाकी असून तो पर्यंत शेतकºयांच्या हातात काही पिक येते की नाही, अशी भीती शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे. वनविभागाने रानडुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी पंढरीनाथ आव्हाड, मंगल साहेबराव आव्हाड, विठाबाई शिवाजी वाघ, वाल्मीक सानप, सोपान आव्हाड, विजय आव्हाड, सोपान वाघ, ज्ञानदेव आव्हाड, सागर वाघ, माधव वाघ, आप्पा वाघ, भानूदास वाघ, सूरेश वाघ, चंद्रभान आव्हाड आदींनी केली आहे.

मुगाला फुटले कोंब

चांदोरी जिल्ह्यासह निफाड तालुक्यात मागील दहा दिवसापासून पावसाची संतत धार सुरू आहे. आभाळात ढगांची गर्दी, ऊन- सावलीचा पाऊस सुरू आहे. अधून मधून पावसाचे जोरदार आगमन होत आहे. या पावसामुळे शेतात मोठया प्रमाणात तण उगवले आहे . तसेच शेतात उगवलेल्या मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मुगाला कोंब फुटून मातीत मिसळत आहे.

Web Title: Haidos of cows at Rajapur; Damage to maize crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.