शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

थांबले असते ना बाळासाहेब ! 

By श्याम बागुल | Updated: November 2, 2019 18:08 IST

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, अशी भाषा विधानसभा निवडणुकीतील रिंगणातील सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यातून निवडणुकीच्या प्रचारात कोणाचा, किती व कसा लटका विरोध होता हे स्पष्ट झाले आहेच. असाच काहीसा प्रकार नाशिकच्या भूमीत निवडणुकीनंतर घडू लागला आहे.

ठळक मुद्देसानप भ्रष्टाचाराच्या गंगेत न्हायले असताना त्यांचा सेनेतील प्रवेश मुख्यमंत्र्यांना चालणार कासानप यांचा भ्रष्टाचार ते खपवून घेणार काय?

श्याम बागुलनाशिक : ‘पाच वर्षे सर्व पदे दिली, अपेक्षा हीच होती की, सेवक म्हणून बाळासाहेब सानप हे काम करतील. परंतु त्यांना पक्षाच्या संस्कृतीचा विसर पडला आणि ते भ्रष्टाचाराच्या गंगेत आंघोळ करणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही’ असा इशारा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पराभूत झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत सानप यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या वळचणीला जावे या दोन्ही घटनांचा अर्थाअर्थी काही तरी संबंध असण्याला वाव आहे. आता प्रश्न एवढाच आहे की सानप भ्रष्टाचाराच्या गंगेत न्हायले असताना त्यांचा सेनेतील प्रवेश मुख्यमंत्र्यांना चालणार का आणि सानप यांचा भ्रष्टाचार ते खपवून घेणार काय?

राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, अशी भाषा विधानसभा निवडणुकीतील रिंगणातील सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यातून निवडणुकीच्या प्रचारात कोणाचा, किती व कसा लटका विरोध होता हे स्पष्ट झाले आहेच. असाच काहीसा प्रकार नाशिकच्या भूमीत निवडणुकीनंतर घडू लागला आहे. गंगेच्या काठावर उभे राहून बाळासाहेब सानप यांच्याविषयी भ्रष्टाचाराचे बोल खुद्द मुख्यमंत्र्यांनी लावल्यानंतर सानप यांची भाजपाने उमेदवारी का कापली यामागचे गुपीत उघड झाले. पार्टी विथ डिफरन्समध्ये गेल्या तीस वर्षांपासून असलेले सानप भ्रष्टाचाराच्या गंगेत आकंठ बुडाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगावे व त्याची साधी भनक नाशिककरांना लागू नये? उलटपक्षी त्याच बाळासाहेब सानपांवर भ्रष्टाचारी असताना भाजपाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या लादून त्यांच्या अगोदरच्या वजनापेक्षा अधिक भार तरी का द्यावा याचे उत्तर मात्र मुख्यमंत्री आपल्या निवडणूक प्रचाराच्या भाषणात देऊ शकले नाहीत. सानप यांच्या मतदारसंघातच त्यांचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे साहजिकच सानप यांच्याकडून पलटवार होणे स्वाभाविक होते, ‘इतकी वर्षे पक्षाचे काम केले तेव्हा भ्रष्टाचार दिसला नाही का’ असा उलट सवाल सानप यांनी केल्यावर त्याला मात्र कोणी प्रत्युत्तर केले नाही. त्यामुळे सानप हे मुख्यमंत्र्यांच्या धमकीला न घाबरता विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात त्यांनी कडवी झुंज दिली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांच्या लढावू बाण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कौतुक केले. एवढेच नव्हे तर सानप यांचा भाजपातील ३० वर्षांतील संघटन कौशल्याचा पुरेपूर वापर करून घेण्यासाठी त्यांच्यावर राष्टÑवादीची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याचे सूतोवाचही सानप यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सानप यांच्या भ्रष्टाचारावर जणूकाही राष्ट्रवादीने पांघरूण घातले असताना दुसºयाच दिवशी सानप यांनी थेट ‘मातोश्री’ गाठून सेनेचे शिवबंधन हातात बांधले. आता प्रश्न असा निर्माण होतो, राष्ट्रवादीने सानप यांना उमेदवारी दिली व भाजप-सेनेने मिळून त्यांचा पराभव केला असताना सानप सेनेच्या वळचणीला का गेले हे स्पष्ट होऊ शकले नाही. कुठल्या तरी कार्यक्रमात सानप यांनी आपले राष्ट्रवादीत मन रमू शकले नाही, हिंदुत्ववादी विचाराशीच आपले जुळू शकते म्हणून शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. आता सानप यांनी हातात शिवबंधन बांधले आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिलेला असून, आगामी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे व शिवसेनेचे त्यांना समर्थन राहील हेदेखील तितकेच खरे आहे. अशा परिस्थितीत मित्रपक्ष सेनेत भ्रष्टाचाराच्या गंगेत न्हालेले सानप मुख्यमंत्र्यांना चालतील काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सानप यांचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही ही नाशिककरांच्या साक्षीने केलेली घोषणा शब्दाला पक्के असलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात आणलीच तर बचावाला सत्तेतील पक्षच हवा, अशा हेतूने तर सानप यांनी शिवसेना प्रवेश केला नसावा? अर्थात राजकारणात कधीही काहीही होऊ शकते तसे कोणी कधीच कोणाचा कायमचा मित्र व शत्रूही नसतो त्यामुळे संभाव्य कारवाईच्या भीतीने बाळासाहेब सानप यांनी पक्षांतर करण्याची केलेली घाई जरा अतीच म्हणावी लागेल.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपाShiv Senaशिवसेना