शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

सव्वा कोटीचा गुटख्याचा साठा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 01:27 IST

राज्यात गुटख्याची विक्री, साठवणूक आणि वाहतूक यावर प्रतिबंध असतानासुद्धा विक्रीसाठी चोरट्या मार्गाने राजस्थानमधून दोन कंटेनर भरून मोठ्या प्रमाणात गुटखा नाशिकमध्ये आणला जात होता; मात्र पोलिसांनी गुटखा पुरवठादार-खरेदीदारांचा हा कट हाणून पाडला.

ठळक मुद्देचौघे संशयित ताब्यात : राजस्थानच्या दोन कंटेनरमधून अवैध वाहतूक

नाशिक : राज्यात गुटख्याची विक्री, साठवणूक आणि वाहतूक यावर प्रतिबंध असतानासुद्धा विक्रीसाठी चोरट्या मार्गाने राजस्थानमधून दोन कंटेनर भरून मोठ्या प्रमाणात गुटखा नाशिकमध्ये आणला जात होता; मात्र पोलिसांनी गुटखा पुरवठादार-खरेदीदारांचा हा कट हाणून पाडला. वणीजवळील करंजखेड फाट्यावर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने सापळा रचून हे कंटेनर रोखले. सुमारे एक कोटी २४ लाख ३४ हजार ७३० रुपयांचा गुटख्याचा मोठा साठा या कंटेनरमधून जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा नाशिक-सापुतारा मार्गावरून वणी येथून शहराकडे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी त्वरित वणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक स्वप्नील राजपूत सचिन पाटील यांना सापळा रचण्याचे आदेश दिले. करंजखेडजवळील फाट्यावर पोलिसांनी शनिवारी (दि.१६) रात्री सापळा रचला. यावेळी संशयास्पद कंटेनर (आरजेजीए ३९१४) आणि दुसरा कंटेनर (आरजे ३० जीए ३८२४) एकापाठोपाठ आले असता पोलिसांनी शिताफीने ते रोखले. या दोन्ही कंटेनरची पथकातील पोलिसांनी झडती घेतली असता यामध्ये मिराज कंपनीचा राज्यात विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. यामुळे पोलिसांनी तत्काळ या दोन्ही कंटेनरचे चालक, वाहक संशयित महेंद्रसिंह, शंबुसिंहानी सोलंकी (३८, रा. उदयपूर), श्यामसिंग चतुरसिंह राव (४४), अर्जुनसिंग जसवंतसिंग राणावत (५६, दोघे, रा. बिदसर, चितोडगड), लोगल मेहवाल (४८,रा. उदयपूर) यांना गुटख्याची नाशिकमार्गे राज्यात विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आल्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्यांनी गुटख्याच्या अवैध वाहतुकीसाठी वापरलेले दोन्ही मोठे कंटेनर जप्त केले आहेत. या गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांनी गुटख्याचा माल व कंटेनर असा सुमारे एक कोटी ६४ लाख ३७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाआहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीArrestअटक