मनमाडला गुरुद्वारामध्ये गुरूमत समागम कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:43 IST2021-02-23T21:13:59+5:302021-02-24T00:43:23+5:30

मनमाड : येथील गुप्तसर साहेब गुरुद्वारा मध्ये धन धन गुरू हर राय साहेब यांच्या प्रकाश पूरब निमित्त विशेष गुरुमत समागमचे आयोजन करण्यात आले होते.

Gurumat Samagam program at Manmadla Gurdwara | मनमाडला गुरुद्वारामध्ये गुरूमत समागम कार्यक्रम

मनमाडला गुरुद्वारामध्ये गुरूमत समागम कार्यक्रम

ठळक मुद्देअखंड पाठ, भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.

मनमाड : येथील गुप्तसर साहेब गुरुद्वारा मध्ये धन धन गुरू हर राय साहेब यांच्या प्रकाश पूरब निमित्त विशेष गुरुमत समागमचे आयोजन करण्यात आले होते.

तीन दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमात गुरूग्रंथ साहिब ग्रंथाचा अखंड पाठ, भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमात पंजाबहून आलेले कीर्तनी जथा भाई जीबन सिंह लुधियाना, भाई चरणजितसिंह पटना यांचे कीर्तन आणि गायनाचे कार्यक्रम झाले.

कार्यक्रमाचे आयोजन संतबाबा नरींदर सिंहजी, संतबाबा बलविंदर सिंहजी नांदेडवाले, मनमाड गुरुद्वार प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये मुंबई, नाशिक आणि महाराष्ट्रातील अनेक भागातून शीख बांधव व भाविक सहभागी झाले होते.

मनमाड गुरुद्वारा मध्ये गुरूमत समागम कार्यक्रमात सहभागी शीख बांधव.

Web Title: Gurumat Samagam program at Manmadla Gurdwara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.