शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

गुरुकुल शिक्षणाला प्राधान्य द्यावे : मुकुल कानिटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:34 IST

शाळेतील चार भिंतीच्या वर्गात संस्कारमय शिक्षण दिले जात नाही, तर भारतीय शिक्षणात बदल करण्यासाठी गुरुकुल पद्धत उपयुक्त आहे. भारतातही गुरुकुल शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले.

ठळक मुद्देशतायुषी संस्था संवाद संमेलनाच्या समारोपशिक्षणाने पैसा मिळतो असा गैरसमज गुरु कुल शिक्षण पद्धतीत परीक्षा घेतली जात नाही

नाशिक : शाळेतील चार भिंतीच्या वर्गात संस्कारमय शिक्षण दिले जात नाही, तर भारतीय शिक्षणात बदल करण्यासाठी गुरुकुल पद्धत उपयुक्त आहे. भारतातही गुरुकुल शिक्षण पद्धतीला प्राधान्य देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शतकमहोत्सवनिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे आयोजित शतायुषी संस्था संवाद संमेलनाच्या समारोप कार्यक्र माप्रसंगी मुकुल कानिटकर बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या शतकमहोत्सव समितीचे उपाध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर होते. यावेळी व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, कार्याध्यक्ष महेश दाबक, सेक्रे टरी ज्ञानेश्वर कुलकर्णी, सदस्य शोभना भिडे, सहसचिव प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.  शिक्षणाने पैसा मिळतो असा गैरसमज पसरविला आहे, मात्र शिक्षणाने प्रतिष्ठा मिळते. परीक्षेमुळे शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. परीक्षा ही स्मरणशक्तीची घेतली जाते. याचा फायदा ठराविक विद्यार्थ्यांनाच होतो. गुरु कुल शिक्षण पद्धतीत परीक्षा घेतली जात नाही. संस्कार हे शालेय शिक्षणातून मिळत नाही. वर्गात मुले घडत नाहीत. शैक्षणिक वातावरण तयार केले गेले पाहिजे, असेही यावेळी कानिटकर म्हणाले.सूत्रसंचालन प्रा. करु णा कुशारे तर आभार सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी मानले. प्रास्ताविक शोभना भिडे यांनी केले. यावेळी जयंत मोंढे, संजय परांजपे,  वसंत जोशी, डॉ. सारंग इंगळे, डॉ. भारद्वाज, मुंबई येथील व्यवसाय शिक्षण विभागाचे उपसंचालक वाकडे, मिलिंद कचोळे, प्रवीण बुरकुले, मधुकर जगताप यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य उपस्थित होते. चर्चासत्रात सहभाग डॉ. विनायक गोविलकर यांनी संस्थेने राबविलेल्या शतायुषी संस्था संवाद संमेलनाचे कौतुक केले. कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनीही मार्गदर्शन केले. तत्पूर्वी वेध भविष्याचा, स्वायत्तता काळाची गरज या विषयावरील चर्चासत्रात दिलीप टिकले, दिलीप पेठे, शरद कुंटे, महेश दाबक, श्रीरंग देशपांडे, रवींद्र वंजारवाडकर, डॉ. सुनील कुटे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Schoolशाळाeducationशैक्षणिक