पेठ शहरात गुरुदत्त पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 18:05 IST2021-01-21T18:05:00+5:302021-01-21T18:05:24+5:30
पेठ : रमणनाथ महाराज बहुद्देशीय संस्था तानसा व तालुक्यातील भाविकांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून गुरुदत्त पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला.

पेठ शहरात गुरुदत्त पालखी सोहळा
मठाधिपती अलोकनाथ महाराज यांच्या उपस्थितीत फुलमाळांनी सजविलेल्या पालखीची टाळमृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकात सडा रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात आले. शहरासह तालुक्यातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. अबालवृध्दांसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.