यूपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 00:54 IST2020-09-03T21:39:19+5:302020-09-04T00:54:37+5:30
नाशिक : कोरोना महामारीमुळे जगभरातील शैक्षणिक प्रणालीवर मोठा परिणाम झाला असून, यामुळे योग्य अभ्यासक्रम निवडण्यात आणि शिकण्याची नवीन पद्धत अनुकूल करण्यास विद्यार्थ्यांना कठीण जात आहे. या अनपेक्षित परिस्थितीचा विशेष परिणाम शालेय आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला आहे. म्हणूनच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिक्षक दिनानिमित्त लोकमत एज्युकेशन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत’ने अनेक उपक्रम आणि चर्चासत्र आयोजित केले.

यूपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना महामारीमुळे जगभरातील शैक्षणिक प्रणालीवर मोठा परिणाम झाला असून, यामुळे योग्य अभ्यासक्रम निवडण्यात आणि शिकण्याची नवीन पद्धत अनुकूल करण्यास विद्यार्थ्यांना कठीण जात आहे. या अनपेक्षित परिस्थितीचा विशेष परिणाम शालेय आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला आहे. म्हणूनच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिक्षक दिनानिमित्त लोकमत एज्युकेशन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत’ने अनेक उपक्रम आणि चर्चासत्र आयोजित केले.
शिक्षक दिनानिमित्त होणाºया लोकमत एज्युकेशन वेबिनार प्रस्तुत ‘यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन’ या चर्चासत्रामध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असणारी तंत्रे, कौशल्ये आणि रणनीती डिकोडिंग याविषयी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. अविनाश धर्माधिकारी (माजी आयएएस अधिकारी), राजेश डाबरे (आयआरएस, कमिशनर जीएसटी) यांच्यासह मंदार पत्की (२०२० यूपीएससी - २२ रँक) आणि श्री महेश जामखेड (२०१९ एमपीएससी -५७१ रँक) विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. परीक्षा अॅप हे या वेबिनारचे सहायक प्रायोजक आहेत. स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शनानंतर शीतल अकादमी यांच्यातर्फे ‘कौन बनेगा इंग्लिश का चॅम्पियन’ ही स्पर्धा दुपारी ४ वाजता घेण्यात येईल. इंग्लिश भाषेचे कौशल्य आणि शब्दसंग्रह वाढविण्याकरिता हा उपक्रम आयोजित केला असून, १६ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला
स्पर्धेत सहभागी होता येईल. विजेत्यांना रोख रक्कम तसेच २३ इंच एलईडी टीव्ही जिंकण्याची संधी मिळेल.स्पर्धात्मक वेबिनारमध्ये सहभागी होण्याकरिता ँ३३स्र:// ु्र३. ’८/’ङ्म‘ें३ी४िूं३्रङ्मल्ल-
६ीु्रल्लं१5ं४ॅ ही लिंक वापरावी. तसेच ‘कौन बनेगा इंग्लिश का चॅम्पियन’ या स्पर्धेसाठी ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवर ँ३३स्र२:// ६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/ ’ङ्म‘ें३ लॉगिन करावे.