खंबाळे येथे पथकातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:54 PM2019-04-01T23:54:29+5:302019-04-01T23:55:22+5:30

खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे अज्ञात आजाराची लागण झाल्याने टप्याटप्याने ११ गायी दगावल्या होत्या. या अज्ञात विषाणुजन्य आजारामुळे दगावणाऱ्या गायींवरील निश्चित रोगाच्या संशोधनासाठी शनिवारी (दि.३०) पुणे येथील रोग अन्वेषण विभागाच्या पथकाने खंबाळे परिसरात पाहणी करून आढावा घेतला. पथकाने यासंदर्भात आवश्यक माहिती जमा केली आहे. पुणे येथे जाऊन निश्चित स्वरूपाची कारणे शोधली जाणार असल्याचे तालुका पशुवैद्यकीय विभागाने सांगितले.

Guidance by farmers to the farmers at Khambale | खंबाळे येथे पथकातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे आजाराने ग्रस्त गाईची पाहणी करताना पुणे येथील रोग अन्वेषण विभागाचे पथक.

Next
ठळक मुद्देखंबाळे गाव व परिसरातील एकापाठोपाठ गायी दगावत गेल्या.

खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे अज्ञात आजाराची लागण झाल्याने टप्याटप्याने ११ गायी दगावल्या होत्या. या अज्ञात विषाणुजन्य आजारामुळे दगावणाऱ्या गायींवरील निश्चित रोगाच्या संशोधनासाठी शनिवारी (दि.३०) पुणे येथील रोग अन्वेषण विभागाच्या पथकाने खंबाळे परिसरात पाहणी करून आढावा घेतला. पथकाने यासंदर्भात आवश्यक माहिती जमा केली आहे. पुणे येथे जाऊन निश्चित स्वरूपाची कारणे शोधली जाणार असल्याचे तालुका पशुवैद्यकीय विभागाने सांगितले.
सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे शनिवारपासून (दि. २३) अज्ञात आजाराची लागण गावातील अनेक शेतकऱ्यांच्या गायींना झाली. या आजारामुळे आजपर्यंत खंबाळे येथील दहा ते पंधरा गायी दगावल्या आहेत, तर सुरेगावातही एक गाय दगावली. कोकणात आढळणारा बोटूलिझम (हळवा) हा आजार असण्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केली. या आजाराची लागण झाल्यानंतर खंबाळे गाव व परिसरातील एकापाठोपाठ गायी दगावत गेल्याने तालुका तसेच जिल्हा पातळीवरील पशुवैद्यकीय अधिकाºयांच्या पथकाने याचा आढावा घेतला.
मात्र त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. दौंड (पुण)े येथे महाराष्टÑासह सात राज्यांतील रोग अन्वेषण विभागाला याची माहिती दिल्यानंतर तेथील पथकाने खंबाळे येथे येऊन पाहणी केली. बोटूलिझम हा प्रामुख्याने गायी, म्हशींना होणारा जीवघेणा विषाणुजन्य रोग असून, मृत कुजलेल्या जनावरांमध्ये या रोगाची झपाट्याने वाढ होते. कुजलेला, सडलेला पाला पाचोळा, चारा, डबक्यातील दूषित पाणी पिण्यात आल्याने त्यातील जीवाणूंनी तयार केलेले विष पोटात गेल्याने जनावरांना हा रोग होतो. जनावरांना ताप येणे, भूक मंदावणे, तोंडातून लाळ येणे, कंबरेचा मागील भाग लुळा होणे ही या रोगाची प्राथमिक लक्षणे असून, श्वासोच्छ्वासाला अडचण निर्माण होऊन जनावर दगावते.

Web Title: Guidance by farmers to the farmers at Khambale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी