‘आयसीएआय’तर्फे विद्यार्थ्यांना जीएसटी, लेखापरीक्षण मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:18 IST2018-10-26T23:01:37+5:302018-10-27T00:18:00+5:30
इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित आपटे यांनी सोमवारी (दि.२२) नाशिक शाखेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित आपटे यांचा सत्कार करताना प्रशांत येवले. समवेत राहुल चिंचोलकर, आर. के. देवधर, सूरज लाहोटी.
नाशिक : इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित आपटे यांनी सोमवारी (दि.२२) नाशिक शाखेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आयसीएआयच्या नाशिक शाखेतर्फे सोमवारी नीमा हॉल येथे ‘जीएसटी अंतर्गत वार्षिक विवरण दाखल करणे व लेखा परीक्षण’ विषयावर चर्चासत्राच्या माध्यमातून अमित आपटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.
जीएसटीसंदर्भात संस्थेने प्रकाशित केलेल्या जीएसटी व नफाखोरी विरोधी मार्गदर्शक सूचनांच्या विविध पुस्तकांविषयी माहिती देतानाच भारतभरात सुमारे ७५ हजारहून अधिक सीएमए (कॉस्ट अॅण्ड मॅनेजमेंट अकाउंटंट) सभासद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राहुल चिंचोलकर यांनी जीएसटी लेखापरीक्षण व वार्षिक परतावा याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रशांत येवले, दीपक जोशी यांच्यासह प्रशांत येवले, रवींद्र देवधर यांच्यासह औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी आणि सीएमए सभासद व विद्यार्थी उपस्थित होते.