उन्हाळ्यात फळभाज्या महागल्या; आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 18:27 IST2019-04-26T18:26:37+5:302019-04-26T18:27:57+5:30
उन्हाच्या झळा बसू लागल्याने शेतमालाला पाणी कमी पडू लागले आहे. परिणामी शेतातील पिकांचे उत्पादन घटत चालले आहे. सर्वच शेतमालाचे उत्पादन घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत.

उन्हाळ्यात फळभाज्या महागल्या; आवक घटली
सिन्नर : उन्हाच्या झळा बसू लागल्याने शेतमालाला पाणी कमी पडू लागले आहे. परिणामी शेतातील पिकांचे उत्पादन घटत चालले आहे. सर्वच शेतमालाचे उत्पादन घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत.
फळभाज्यांचे भाव वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. सर्वच भाज्या व फळांचे भाव वाढल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतमालाची आवक घटत चालल्याने बाजारभाव तेजीत आहेत.