मका आवकेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:36 IST2019-11-28T00:34:44+5:302019-11-28T00:36:42+5:30
उमराणे : लष्करी अळीचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे प्रतवारी घसरल्याने येथील बाजार समितीत मका (भुसार) मालाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, प्रतवारी घसरलेल्या मालाला चांगल्या मालाच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांपर्यंतचा फटका बसत आहे, तर चांगल्या मालाला १८०० ते १९०० रु पयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे.

उमराणे बाजार समितीत मका मालाची झालेली आवक.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमराणे : लष्करी अळीचा प्रादुर्भाव व परतीच्या पावसामुळे प्रतवारी घसरल्याने येथील बाजार समितीत मका (भुसार) मालाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, प्रतवारी घसरलेल्या मालाला चांगल्या मालाच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपयांपर्यंतचा फटका बसत आहे, तर चांगल्या मालाला १८०० ते १९०० रु पयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे.
मागील वर्षी तीव्र दुष्काळाची झळ सोसल्यानंतर शेतकरी बांधवांनी चालूवर्षी खरीप हंगामातील कांद्यापाठोपाठ दुसरे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया मका पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. परंतु पेरणी केल्यानंतरच्या अवघ्या पंधरा दिवसांतच लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मका पीक संकटात सापडले होते.
मात्र परिस्थितीवर मात करीत शेतकऱ्यांनी तीन ते चार वेळा महागड्या औषधांची फवारणी करून काही प्रमाणात हे पीक वाचविले होते, असे असतानाच ऐन मका कापणीच्या वेळी परतीच्या पावसाने तब्बल पंधरा ते वीस दिवस धुमाकूळ घातल्याने कापणी झालेल्या मका पिकाची कणसे पाण्यात भिजली होती. परिणामी या कणसांना कोंब फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे ही कणसे जास्त दिवस टिकावू नसल्याने शेतकºयांना नाइलाजास्तव हा मका काढून लगेच बाजारात विक्रीस आणावा लागत असल्याने बाजार समितीत मका मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.परतीच्या पावसाचा फटकाउमराणे बाजार समितीच्या आवारात आज बुधवारी (दि. २७) ५५० वाहनांतून सुमारे नऊ हजार ५०० क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून, बाजारभाव कमीत कमी ११०० रु पये, जास्तीत जास्त १८६१ रु पये तर सरासरी १६५० रुपयांपर्यंत होते. परतीच्या पावसामुळे जास्त दिवस कणसे पाण्यात भिजल्याने दाणे खराब झाले आहेत. त्यामुळे मका मालाची प्रतवारी घसरल्याने बाजारभाव कमी मिळत आहे. त्यामुळे काही शेतकºयांना मका पिकापासून मिळणारे उत्पन्न तर दूरच; परंतु उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याचे मका विक्रेत्या शेतकºयांनी बोलून दाखविले आहे.