चाळीतील कांदा सडल्याने उत्पादकांना आर्थिक झळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:18 AM2021-08-27T04:18:16+5:302021-08-27T04:18:16+5:30

अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पोळ कांद्याचे बियाणे शेतात टाकले होते. वातावरणात अचानक होणारे बदल व नुकत्याच झालेल्या ...

Growers suffer financial loss due to rotting onion | चाळीतील कांदा सडल्याने उत्पादकांना आर्थिक झळ!

चाळीतील कांदा सडल्याने उत्पादकांना आर्थिक झळ!

Next

अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पोळ कांद्याचे बियाणे शेतात टाकले होते. वातावरणात अचानक होणारे बदल व नुकत्याच झालेल्या रिमझिम पावसामुळे रोपे खराब झाली असून, या शेतकऱ्यांना पुन्हा महागडे बियाणे उपलब्ध करावे लागणार असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

____

दरवर्षी डिसेंबरपर्यंत चाळीत टिकणारा कांदा चालू वर्षी चाळीत टाकल्यानंतर महिनाभरातच सडू लागल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. परंतु कांद्याचे दर वाढण्याच्या अपेक्षेने शेतकरी होणारे नुकसान सहन करीत होते. परंतु वातावरणातील बदलांमुळे कांदे सडण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली व संपूर्ण नुकसान होण्यापेक्षा शाबूत असलेला कांदा विकून मिळेल ते पदरात पाडून घेण्याचा दृष्टिकोन ठेवत शेतकऱ्यांनी चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणण्यास प्रारंभ केला आहे.

उन्हाळी कांदा बियाणांत झालेली फसवणूक, सर्वत्र तुटवडा असल्यामुळे नाइलाजास्तव अव्वाच्या सव्वा किंमत मोजून खरेदी केलेले नित्कृष्ट कांदा बियाणे, वारंवार कांद्याची रोपे खराब झाल्यामुळे उन्हाळी कांदा लागवडीस झालेला उशीर तसेच उन्हाळी कांदा काढणीच्या वेळेस आलेल्या अवकाळी पावसामुळे घाईगर्दीत चाळीत साठवणूक केलेल्या कांद्याच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला.

- प्रेमानंद देवरे, शेतकरी, वाजगाव

फोटो -. २६ देवळा १

वाजगाव येथे चाळीतील सडलेला कांदा.

260821\26nsk_11_26082021_13.jpg

वाजगाव येथे चाळीतील सडलेला कांदा.

Web Title: Growers suffer financial loss due to rotting onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.