शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

गांधी तलावातील तळ काँक्रिटीकरणाचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:24 IST

गोदापात्रातील कॉँक्रिटीकरणाच्या कामाबाबत वाद निर्माण झाल्यानंतर कंपनीने या कामाला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवार (दि. १४)पासून गांधी तलावातील काम बंद केले आहे. यानंतर महापालिकेने या कामासाठी रोखलेले पाणी पुन्हा गांधी तलावात सोडले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने कामासंदर्भात सल्लागार कंपनीलाच अहवाल देण्यास सांगितले असून, त्यासाठी किमान एक ते दीड महिना कालावधी लागणार असल्याने त्यानंतरच हे काम सुरू होऊ शकेल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देमनपाने पाणी सोडले ; दीड महिन्यात अहवाल प्राप्त होणार

नाशिक : गोदापात्रातील कॉँक्रिटीकरणाच्या कामाबाबत वाद निर्माण झाल्यानंतर कंपनीने या कामाला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवार (दि. १४)पासून गांधी तलावातील काम बंद केले आहे. यानंतर महापालिकेने या कामासाठी रोखलेले पाणी पुन्हा गांधी तलावात सोडले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने कामासंदर्भात सल्लागार कंपनीलाच अहवाल देण्यास सांगितले असून, त्यासाठी किमान एक ते दीड महिना कालावधी लागणार असल्याने त्यानंतरच हे काम सुरू होऊ शकेल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. या कामाविषयी तज्ज्ञांमध्येच मतभिन्नता असली तरी कंपनीच्या कामाला दोन वर्षांपूर्वीच मंजुरी देण्यात आली असली तरी आता या विषयावर खल सुरू झाल्यानेदेखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गोदावरी नदीतील विविध कुंडांचे तळ काँक्रिटीकरण काही वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. आता ते काढण्याबाबत दुमत असले तरी आता ते काढण्याबाबत पर्यावरणप्रेमींची मागणी झाली आणि न्यायालयानेदेखील त्याबाबत प्रशासनाला निर्णय घेण्याचे आदेश दिल्यानंतर याचिकाकर्त्यांना प्रशासनाला सादरीकरण करण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतर स्मार्ट सिटी योजनेत प्रोजेक्ट गोदा प्रकल्प प्रस्तावित झाल्यानंतर त्यात या कामाचा समावेश करण्यात आल्या. कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आणि निविदा मंजुरीचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर आता कॉँक्रिटीकरण करण्याची गरज काय? असा प्रश्न उपस्थित झाल्याने नव्याच वादाला सुरुवात झाली. शुक्रवारी (दि.१३) कंपनीच्या वतीने शुभारंभ करण्यात येणार होता. सर्व प्रथम गांधी तलावातून हे काम सुरू करण्यात येणार असल्याने त्यात जाणारे पाणी थांबवून तलावातील कचरा, गाळ काढण्यात आले. दरम्यान, या कामाला काहींनी विरोध केला. त्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तातडीने स्मार्ट सिटी कंपनीच्या सभागृहात अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरी