आत्मा मालिक विद्यालयात संत गाडगे महाराजांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 20:23 IST2021-02-23T20:23:15+5:302021-02-23T20:23:58+5:30
जळगाव नेऊर : येथील आत्मा मालिक विद्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.

आत्मा मालिक विद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगी प्राचार्य व शिक्षक वृंद.
ठळक मुद्देमान्यवरांनी बाबांच्या प्रतिमेचे पूजन केले.
जळगाव नेऊर : येथील आत्मा मालिक विद्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमात 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' या गाडगेबाबांच्या भजनाने मान्यवरांनी बाबांच्या प्रतिमेचे पूजन केले. शिक्षक तेजस राऊत यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत गाडगे बाबांच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिली.
यावेळी गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत भोंगळे, विश्वस्त प्रकाश भामरे आदी उपस्थित होते.