मोहाडीत संत नामदेव यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 01:27 IST2021-08-07T01:27:12+5:302021-08-07T01:27:37+5:30

माेहाडी येथील नामदेव शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांना ६७१व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

Greetings to Saint Namdev in Mohadi | मोहाडीत संत नामदेव यांना अभिवादन

मोहाडी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात संत नामदेव महाराज पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना महिलावर्ग.

जानोरी : परिसरातील माेहाडी येथील नामदेव शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांना ६७१व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यानिमित्त श्री लक्ष्मीनारायण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहात रोज पहाटे काकडा आरती, दुपारी महिला भजनी मंडळातर्फे सामुदायिक हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम झाले. शुक्रवारी (दि. ६) सकाळी ११ ते १२ वाजे दरम्यान श्रीकृष्ण वारकरी भजनी मंडळातर्फे संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधीपर अभंगांचे गायन करून १२ वाजता गुलालयुक्त पुष्पांची उधळण करण्यात आली. यावेळी संत शिरोमणी नामदेव महाराज की जय 'चा जयघोष करण्यात आला. भजनाला पखवाजाची साथ पंकज जाधव यांनी दिली. कुणाल डिंगोरे यांच्या हस्ते महाआरती व प्रसाद वाटप झाला. पसायदान म्हणून हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. भजनी मंडळाचे अध्यक्ष मुकुंद जाधव, प्रवीण जाधव, भास्कर जाधव, नंदकुमार ठाकूर, शंकर तिडके, रामभाऊ ढेपले, उत्तम जाधव, लक्ष्मण जाधव, नंदकुमार डिंगोरे, बालाजी बोढाई, वसंत डिंगोरे, सटवा लोंढे, आदित्य काळे, प्रवीण डिंगोरे, महिला मंडळाच्या शोभा डिंगोरे, संगीता डिंगोरे, छाया डिंगोरे, वत्सला बोढाई, उषा डिंगोरे, कल्पना डिंगोरे, मीराबाई जाधव, श्रद्धा डोगमाणे, मंदाकिनी डिंगोरे, श्रीमती शिरसाळे, भारती डिंगोरे, कल्याणी डिंगोरे आदींसह समाज बांधव उपस्थित होते. पंढरीनाथ डिंगोरे यांनी आभार मानले.

 

Web Title: Greetings to Saint Namdev in Mohadi