संत गाडगेबाबा यांना मौजेसुकेणेत अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 17:47 IST2020-12-20T17:47:25+5:302020-12-20T17:47:51+5:30

कसबे सुकेणे : मौजेसुकेणे येथे पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले.संत गाडगेबाबा हे आधुनिक संत होते. शिक्षण व आरोग्य आणि स्वच्छतेचे विचार देऊन निष्काम सेवा केली. संत गाडगेबाबा यांनी देशाला नवा विचार देऊन गावपातळीवर समाजजागृतीचे मोठे काम केले असे विचार प्रसिद्ध कीर्तनकार साहेबराव महाराज राहणे यांनी मांडले.

Greetings to Saint Gadge Baba | संत गाडगेबाबा यांना मौजेसुकेणेत अभिवादन

संत गाडगेबाबा यांना मौजेसुकेणेत अभिवादन

मौजेसुकेणे येथील बाणेश्वर महादेव मंदिरात झालेल्या कार्यक्रमात उपसरपंच सचिन मोगल, संजय मोगल, विजय मोगल, जगन्नाथ अरिंगळे, संग्राम मोगल, सतीश मोगल यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नाना सगर, लक्ष्मण सगर, अनिल रणशिंगे, योगेश सगर, राजेंद्र रणशिंगे, प्रकाश सगर, नितीन रणशिंगे, नीलेश सगर, लहू पवार, हेमंत वाल्हे, कैलास सगर, शरद सगर आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Saint Gadge Baba