क्रांतिज्योतीला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 11:54 PM2020-01-04T23:54:51+5:302020-01-04T23:55:10+5:30

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्ह्यात सर्वत्र बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ठिकठिकाणी प्रतिमापूजन, विविध स्पर्धा व अन्य कार्यक्रम घेण्यात आले.

Greetings for the revolution | क्रांतिज्योतीला अभिवादन

सिन्नर येथील लोकनेते वाजे विद्यालयात बालिका दिनानिमित्त प्रतिमापूजन करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्याध्यापक कहाडंळ, बाजीराव नवले, ए. पी. शिंदे, प्राची चव्हाण, एम. ए. बनकर, वैशाली वाजे, के. आर. राहणे आदी.

Next
ठळक मुद्देबालिका दिन। विविध कार्यक्रम, प्रतिमापूजन व स्पर्धा

नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्ह्यात सर्वत्र बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ठिकठिकाणी प्रतिमापूजन, विविध स्पर्धा व अन्य कार्यक्रम घेण्यात आले.
सार्वजनिक वाचनालय, सिन्नर
येथील सार्वजनिक वाचनालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी कार्यवाह हेमंत
वाजे, मनीष गुजराथी, चंद्रशेखर कोरडे, सागर गुजर, अजय शिंदे, नगरसेवक ज्योती वामने, सुजाता तेलंग, अंबादास भालेराव, श्यामसुदंर झळके आदींसह कर्मचारी व वाचक उपस्थित होते.
महात्मा फुले विद्यालय
सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले शैक्षणिक संकुलात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ होते. व्यासपीठावर सचिव विष्णुपंत बलक, उपाध्यक्ष कैलास झगडे, संचालक राजेंद्र आंबेकर, संजय लोंढे, अर्चना बलक, मीनाक्षी गवळी, दत्तात्रय गोळेसर, नामदेव लोणारे आदी मान्यवर उपस्थित
होते. मान्यवरांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी लेक वाचवा लेक शिकवा आणि अशा होत्या सावित्रीमाई ही पथनाट्ये सादर केली. यावेळी माध्यमिकच्या वंदना साळुंखे, रामनाथ लोंढे, रमेश बलक, उपप्राचार्य तानाजी ढोली, राजेंद्र भालेराव, संगीता राजगुरु आदी उपस्थित होते.
वाजे विद्यालय, सिन्नर
लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ अध्यक्षस्थानी होते. यावेळी पद्मारेखा जाधव व बाजीराव नवले हे उपस्थित होते. मुख्याध्यापक कहाडंळ, बाजीराव नवले यांनी सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य याविषयी माहिती सांगितली. श्वेता पगार, दिव्या गायकवाड, अपर्णा गुळे, यांनी भाषणे केली. मानसी पंडित या विद्यार्थिनींनी नाटिका सादर करून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा परिचय करून दिला. शिवनाथ पांगारकर, पी टी पगार, पी आर फटांगरे, पीआर मोकळ, आर व्ही वाजे, व्ही एन शिंदे, व्ही. एन. जाधव आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. श्रावणी गोसावी हिने आभार मानले.
राष्टÑवादी कॉँग्रेस, सिन्नर
स्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील नगरपालिकेच्या आवारातील पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विष्णू अत्रे, शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, ज्येष्ठ नेते डी. डी. गोर्डे, हेमंत दिघोळे, रवींद्र काकड, संजय काकड, कैलास झगडे, वैभव गायकवाड, अभिषेक माळी, निवृत्ती पवार, भाऊसाहेब पवार, सुधाकर झगडे, शैलेश गडाख, आकाश विश्वकर्मा, डॉ. संदीप लोंढे, योगेश माळी, वाळीबा गुरुकुले, पांडुरंग वारुंगसे, कैलास निरगुडे, रवि मोगल, प्रवीण आंबेकर, आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा, वारेगाव
पाथरे : वारेगाव येथील प्राथमिक शाळेत प्रतिमापूजन करून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त प्राथमिक शाळा व अंगणवाडी येथे विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील दोन्ही अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ५० खुर्च्या भेट देण्यात आल्या. तसेच ग्रामपंचायत वारेगाव यांच्याकडून जि.प.शाळेला संगणक संच भेट देण्यात आला. गावामध्ये बेटी बचाव, बेटी पढाओ, सन्मान करूया लेकीचा या घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेच्या आवारात लेजीम पथकाने कार्यक्र म सादर केला. तसेच विद्यार्र्थ्यांनी भाषण केले. काही विद्यार्थ्यांनी समूह गीत सादर केले. यावेळी सरपंच मीननाथ माळी, उपसरपंच सुनीता वाणी, ग्रामसेवक नितीन मेहेरखांब, ग्रामपरिवर्तक अमोल कुकडे, सोमनाथ घोलप, मुख्याध्यापक बाळासाहेब सोळंके, मनीषा पदमे, ज्योती नेर्लेकर, नानासाहेब गुंजाळ, वैभव गव्हाणे, पांडुरंग चिने, सुभाष गुंजाळ, मीनाताई राजगुरू, आशा सोमवंशी आदींसह विद्यार्थी-विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
नाईक हायस्कूल, नांदूरशिंगोटे
नांदूरशिंगोटे : येथील व्ही. पी. नाईक हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षक अर्चना मुंडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक बबन खैरनार उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालय, टाकेद
इगतपुरी : तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ताराबाई बांबळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच रामचंद्र परदेशी, ग्रामपंचायत सदस्य नंदाबाई शिंदे, सुशीला भवारी, रतन नाना बांबळे, विक्र मराजे भांगे, सतीश बांबळे, डॉ. श्रीराम लहामटे, जगन घोडे, केशव बांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Greetings for the revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.