ग्राम स्वच्छतेतुन राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 15:52 IST2020-02-23T15:51:39+5:302020-02-23T15:52:03+5:30
नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकुर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गावातील अंतर्गत रस्ते, नाले, ग्रामपंचायतीचे प्रांगण आदी ठिकाणी स्वच्छता करु न स्वच्छता अभियान राबवले.

ग्राम स्वच्छतेतुन राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन
गावातील मान्यवरांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनकार्याविषयी भाषणे केली. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य तुकाराम सहाणे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मूर्तिपूजा, अंधश्रद्धा निर्मूलन, सावकारी कर्ज, व्यसनमुक्ती याविरु द्ध गाडगे महाराजांनी जनजागरण करु न समाजाला सुधारण्यासाठी सामाजिक कार्य केल्याचे सांगितले.
याप्रसंगी साकुर ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद आवारी, उपसरपंच दिनकर सहाणे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाणे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
1) साकुर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावातील अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता करतांना ग्रामस्थ. (23साकुरग्राम)