डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 00:47 IST2021-04-14T19:33:47+5:302021-04-16T00:47:54+5:30
ब्राह्मणगाव : येथे राष्ट्रपुरुष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.

येथील भगवान बुध्द मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतांना सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापू राज खरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व समाज बांधव.
ब्राह्मणगाव : येथे राष्ट्रपुरुष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.
सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापू राज खरे, सदस्य विनोद अहिरेआदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
त्यानंतर येथील बुध्द मंदिरात भगवान बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन केले.
जयंती निमित्त भगवान बुध्द विहाराची रंग रंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गेल्यावर्षी व याही वर्षी कोरोनामुळे मिरवणूक व अन्य कार्यक्रम झाले नाहीत. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळत जयंती कार्यक्रमात सहभाग घेतला.