छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:12 IST2020-02-19T23:05:58+5:302020-02-20T00:12:09+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी दाभाडी, सटाणानाका, मालेगाव कॅम्प, झोडगे, रावळगाव आदी ठिकाणी अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, प्रतिमापूजन करण्यात आले. येथील शिवतीर्थावरील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह मध्यवर्ती शिवजयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मालेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, माधवराव जोशी, विजयालक्ष्मी अहिरे, धर्मा भामरे, केवळ हिरे, प्रमोद शुक्ला, नंदकुमार सावंत आदी.
मालेगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी दाभाडी, सटाणानाका, मालेगाव कॅम्प, झोडगे, रावळगाव आदी ठिकाणी अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, प्रतिमापूजन करण्यात आले. येथील शिवतीर्थावरील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह मध्यवर्ती शिवजयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मालेगाव : शहर-परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा व पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
येथील शिवतीर्थावरील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मध्यवर्ती शिवजयंती समितीच्या पदाधिकाºयांसह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेच्या अधिकाºयांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सायंकाळी सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांमध्ये तरुणाईने हातात भगवे झेंडे घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला होता. ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात येऊन कमानी उभारण्यात आल्याने शहर भगवेमय झाले होते. कृषिमंत्री दादा भुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीने सवाद्य शिवज्योत मिरवणूक काढली होती. दोन अश्वांवर राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवराय यांच्या वेशातील दोघा तरुणांना बसवून शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत लेजीम नृत्य लक्षवेधी ठरले होते. या मिरवणुकीत विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. समितीचे अध्यक्ष दीपक पाटील, कार्याध्यक्ष निंबा निकम, शरद बच्छाव, अमोल चौधरी, शंकर नागपुरे, अनिल भुसे, अजय गवळी, राजाराम पाटील, भरत पाटील, अॅड. चंद्रशेखर देवरे, जितेंद्र देसले, प्रमोद शुक्ला, रामदास बोरसे, कैलास तिसगे, जगदीश पाटील, राजू अलिझाड, अशोक पाटील, कैलास शर्मा, शरद पाटील, राम शिंपी, केवळ हिरे, पंडित जाधव, प्रमोद पाटील आदींनी सहभाग घेतला.