आहिल्याबाई होळकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 00:26 IST2021-05-31T19:35:45+5:302021-06-01T00:26:51+5:30
लोहोणेर : लोहोणेर येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

लोहोणेर येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन करताना गावातील महिला.
ठळक मुद्देप्रतिमेचे पूजन लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
लोहोणेर : लोहोणेर येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन लोहोणेर ग्रामपंचायतीच्या सरपंच पूनम पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर गरजू व गरीब व्यक्तींना किराणा माल, मास्क व सनिटायझर, वाटप करण्यात आले. यावेळी कोळी महासंघ देवळा तालुका अध्यक्ष योगेश पवार, प्रसाद देशमुख, रतिलाल परदेशी, रवींद्र वनसे, साहेबराव साप्ते, निंबा साप्ते, पप्पू साप्ते, दत्तात्रेय सोनजे, संजय बच्छाव, मल्हारी बच्छाव, आबा वनसे, विकी साप्ते, आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.