अमरावती-मुंबई रेल्वेगाडीला हिरवा कंदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 00:57 IST2021-01-22T19:50:19+5:302021-01-23T00:57:33+5:30
मनमाड: रेल्वे प्रशासनाकडून सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्यात आलेल्या अमरावती मुंबई विशेष रेल्वे गाडीला अखेर हिरवा कंदिल मिळाला असून ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरावती-मुंबई रेल्वेगाडीला हिरवा कंदिल
येत्या २५ जानेवारीपासून सुरू करण्यात येणारी गाडी क्रमांक ०२११२ अप अमरावती-मुंबई विशेष गाडी आणि गाडी क्रमांक ०२१११ डाऊन मुंबई-अमरावती विशेष गाडी ही पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील जनतेच्या सोयीची गाडी रद्द केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. प्रवाशांची भावना ओळखून रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या गाडीला मूर्तिजापूर, बडनेरा, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक असे थांबे देण्यात आले आहेत.