नाशिकच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:51 PM2020-07-10T23:51:16+5:302020-07-11T00:20:15+5:30

आयसीएसई बोर्डाचा निकाल शुक्रवारी (दि. १०) जाहीर झाला असून, देशभरात दहावीचा निकाल ९९.३४ टक्के , तर बारावीचा निकाल ९६.८४ टक्के लागला असून, नाशिकच्या शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. परंतु, कोरोनामुळे काही पेपर होऊ शकलेले नसल्याने काही विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात आल्याने दहावी आणि बारावी दोन्ही निकालांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

Great success of Nashik students | नाशिकच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश

आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. होरायझन अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी.

Next
ठळक मुद्देआयसीएसईचा निकाल जाहीर : शहरातील शाळांची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

नाशिक : आयसीएसई बोर्डाचा निकाल शुक्रवारी (दि. १०) जाहीर झाला असून, देशभरात दहावीचा निकाल ९९.३४ टक्के , तर बारावीचा निकाल ९६.८४ टक्के लागला असून, नाशिकच्याशाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. परंतु, कोरोनामुळे काही पेपर होऊ शकलेले नसल्याने काही विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात आल्याने दहावी आणि बारावी दोन्ही निकालांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनतर्फे (आयसीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल शुक्रवारी दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना ६६६.ू्र२ूी.ङ्म१ॅ व ६६६.१४२४’३. ू्र२ूी.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असल्याचे आयसीएसईतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
यात नाशिकमधील रायन इंटरनॅशनल स्कूल, अशोका युनिव्हर्सल स्कूल, विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल, होरायझन अकॅडमी, सिल्वर ओक युनिवर्सल स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल आदी शाळांनी आपली शंभर टक्के निकालांची परंपरा कायम राखली आहे.
होरायझन अकॅडमीची अश्लेषा शेळके प्रथम
मविप्रच्या होरायझन अकॅडमीचाही शंभर टक्के निकाल लागला असून अश्लेषा शेळके हिने ९८.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून आदित्य मुंदडा ९७.८० टक्के व चिन्मयी मगरने ९६.८० टक्के गुणांसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर यश संपादन केले. सिद्धी आव्हाड व क्रिष्णा हेडा अभिजित पाटील, स्वराज देशमानकर आदी विद्यार्थ्यांनीही लक्षवेधी गुण मिळविले आहे. ८२ विद्यार्थ्यांपैकी २८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त, ४२ टक्के विद्यार्थिना उत्कृष्ट श्रेणीत, तर १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे.

Web Title: Great success of Nashik students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.