Oxygen Express: मोठा दिलासा! विशाखापट्टणमहून निघालेली 'ऑक्सिजन एक्सप्रेस' नाशकात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 12:34 IST2021-04-24T12:28:41+5:302021-04-24T12:34:21+5:30
अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील रुग्णालयांमध्ये पुरेसा ऑक्सिजन साठा नाही

Oxygen Express: मोठा दिलासा! विशाखापट्टणमहून निघालेली 'ऑक्सिजन एक्सप्रेस' नाशकात दाखल
नाशिक: गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील रुग्णालयांमध्ये पुरेसा ऑक्सिजन साठा नव्हता. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी अखेरीस आज नाशिक जिल्ह्याला विशाखापट्टणम येथून आलेल्या 'ऑक्सिजन एक्सप्रेस' च्या माध्यमातून 25 के.एल. चे दोन टँकर प्राप्त झाले आहेत. देवळाली मालधक्का येथे सकाळी ११ च्या सुमारास 'ऑक्सिजन एक्सप्रेस' दाखल झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला गरजेनुसार 85 मेट्रिक टन ऑक्सिजन ऐवजी 56 मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त होत होता. त्यामुळे रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन अभावी खासगी रुग्णालयांनी रुग्ण दाखल करणे बंद केले होते. मात्र आज ऑक्सिजन पुरवठा झाल्याने कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नाशिककरांना मोठा दिलासा! विशाखापट्टणमहून आलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशकात दाखल #CoronavirusPandemic#OxygenEmergencyhttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/CpnniOunv5
— Lokmat (@MiLOKMAT) April 24, 2021
जिल्ह्यात ऑक्सिजनची असलेली गरज आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारा साठा यातील तफावत उद्या येणाऱ्या अधिकच्या 50 मेट्रिक टन ऑक्सिजन टँकरमुळे भरून निघणार आहे, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. व्यवस्थीतरित्या पोहोचावी यासाठी काल जिल्हा प्रशासनाने नियोजन केले होते.