शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

गोदावरीला मोठा पूर ; गंगापूरमधून १३हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:33 PM

पाणलोटक्षेत्रातून पाण्याची जोरदार आवक धरणात होऊ लागल्याने सकाळी नऊ वाजता सोडण्यात आलेल्या ११ हजार क्युसेकच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून सध्या १३ हजार क्युसेक पाणी गोदापात्रात प्रवाहित आहे. दुतोंड्या मारूतीची मुर्ती मानेपर्यंत बुडाली

ठळक मुद्देनदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गंगापूर धरणाचा जलसाठा ८५ टक्क्यावर पोहचला. १३ हजार क्युसेक पाणी गोदापात्रात प्रवाहित

नाशिक :  गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून अद्यापपर्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणलोटक्षेत्रातून पाण्याची जोरदार आवक धरणात होऊ लागल्याने सकाळी नऊ वाजता सोडण्यात आलेल्या ११ हजार क्युसेकच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून सध्या १३ हजार क्युसेक पाणी गोदापात्रात प्रवाहित आहे. दुतोंड्या मारूतीची मुर्ती मानेपर्यंत बुडाली असून नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मध्यरात्रीपासून पुढील दोन दिवस पश्चिम, मध्य महाराष्टÑासह कोकण व नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. घाटक्षेत्राच्या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढला आहे. त्यामुळे गंगापूर धरणात त्र्यंबक, अंबोली या पाणलोटक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. परिणामी गंगापूर धरणाचा जलसाठा ८५ टक्क्यावर पोहचला. सकाळी नऊ वाजेपासून विसर्गात वाढ करण्यात आली आहे. अकरा वाजेपासून गोदावरीच्या जलस्तर उंचविण्यास सुरूवात होऊ लागली.शहरातदेखील मध्यरात्रीपासून संततधार सुरू असल्यामुळे अहल्यादेवी होळकर पूलाखालून पुढे रामकुंडात १३ हजार ३३० क्युसेक इतके पाणी प्रवाहित आहे. मागील २४ तासांत शहरात ३३ मि.मी इतका पाऊस नोंदविला गेला. गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सायखेडा, चांदोरी या भागातदेखील गोदावरीची पातळी वाढली असून सायखेड्याच्या धोकादायक पुलाला पूराचे पाणी लागले आहे. तसेच गोदाकाठावरील दुतोंड्या मारूतीची मुर्ती मानेपर्यंत बुडाली आहे. नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू पुलाला पाणी लागले असून विसर्गात वाढ झाल्यास या पुलावरूनही पूराचे पाणी वाहण्याची दाट शक्यता आहे. पूर बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या पूलांवर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दुतोंड्या मारुती कमरेपर्यंत बुडाला, तर गंगा-गोदावरी मंदिरासह वस्त्रांतरगृहातही पाणी शिरले. गोदाघाटावरील लहान पूल, मंदिरे पाण्याखाली गेली. देवमामलेदार मंदिर, नीळकंठेश्वर मंदिरासह नारोशंकर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. यामुळे विक्रेत्यांनी तत्काळ नदीकाठापासून आपली दुकाने सुरक्षितस्थळी हलविली. नीळकंठेश्वर मंदिर ते रामसेतू पुलापर्यंतच्या नदीकाठच्या विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध वस्तूंचा माल तत्काळ भरून घेत टपऱ्या रिकाम्या केल्या. तसेच नागरिकांनी गोदाकाठालगत असलेली वाहने काढून घेतले आहे. गंगापूर धरणातून होणाºया विसर्गाची पूर्वसूचना मिळाल्याने गोदाकाठावरील रहिवाशांसह विक्रेतेही सतर्क झाले होते.

 

टॅग्स :godavariगोदावरीNashikनाशिकfloodपूरgangapur damगंगापूर धरण