शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

नाशिक पुण्यनगरीत महिला अत्याचारसारख्या पापांचा आलेख वाढताच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 17:27 IST

११ महिन्यांत विनयभंगाच्या तब्बल १८८ आणि बलात्काराच्या ५२ घटना पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्या आहेत.

ठळक मुद्दे११ महिन्यांततब्बल १८८ विनयभंगमहिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘निर्भया’ पथकपोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बलात्काराच्या ५२ घटना

नाशिक : महिला हिंसाचाराला माझा नकार’ असा जागर केला जात असला तरी शहरात महिला हिंसाचाराच्या घटनांना आळा बसू शकलेला नाही. मागील काही महिन्यांपासून ‘निर्भया’ पथक शहराच्या रस्त्यांवर गस्त घालत आहे. यामुळे काही टवाळखोर, रोडरोमीयोंना चाप बसला असला तरी ११ महिन्यांत विनयभंगाच्या तब्बल १८८ आणि बलात्काराच्या ५२ घटना पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्या आहेत. यावरून शहरात महिला अत्याचाराचे स्वरूप सहज लक्षात येते.कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक पुण्यननगरीत महिला अत्याचाराचे पाप दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पोलीस आयुक्तालयांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘निर्भया’ पथकासह विविध उपक्रम हाती घेतले आहे. शहरातील महिलांची वर्दळ असलेल्या ‘हॉट स्पॉट’ची निवड करून त्या ठिकाणांवर साध्या वेशात अन् वाहनात महिला, पुरूष पोलीसांचे पथक ‘वॉच’ ठेवून आहे. या निर्भया पथकाकडून गर्दीच्या ठिकाणी टवाळ्या करणा-या टवाळखोरांवर कारवाईदेखील होत आहे; मात्र महिलांचे विनयभंगबलात्काराच्या घटनांची आकडेवारी बघता मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. विनयभंग, बलात्कारसारख्या घटनांमध्ये बहुतांशवेळा संशयित आरोपी हे पिडितेच्या ओळखीचे असल्याचे तपासात पुढे आले आहे.--इन्फो--...तर १०९१ डायल करा !संकटात सापडलेल्या महिलेने निर्भयाच्या ‘१०९१’ या अतीजलद टोल-फ्री हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास तत्काळ मदत पोहचविली जात असल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. तसेच विविध शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, उद्यानांच्या परिसरातदेखील निर्भया पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी संवाद साधून महिलांना जागरूक केले जात आहे. जेणेकरून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल.विनयभंग : वर्ष - २०१८ (नोव्हें.अखेर) : १७४विनयभंग : वर्ष - २०१९ (नोव्हें.अखेर) : १८८बलात्कार : वर्ष - २०१८/ २०१९ : ५२१७५ गुन्ह्यांची उकलयावर्षी घडलेल्या विनयभंगाच्या १८८ गुन्ह्यांपैकी १७५ गुन्ह्यांमधील संशयितांची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षी १६९ गुन्ह्यांमधील संशयितांचा शोध पोलिसांनी घेतला होता. मागील वर्षी व चालू वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत शहरात ५२ बलात्काराच्या घटना घडल्या तर या पंधरवड्यात दोन अल्पवयीन मुलींसोबत बलात्कार झाल्याची नोंद झाली. या दोन्ही घटनांमधील संशयितांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत; मात्र मागील ५२ गुन्ह्यांमधील संशयित अद्याप निष्पन्न होऊ शकलेले नाही.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMolestationविनयभंगRapeबलात्कारWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी