शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

दिंडोरीतील द्राक्ष उत्पादक आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:13 IST

निफाड तालुक्यानंतर द्राक्ष उत्पादकांमध्ये दिंडोरी तालुक्याचे नाव पुढे येते; परंतु सध्या कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी व सुलतानी संकटाने घाला घातल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतित झाला आहे.

ठळक मुद्देलॉकडाउन : शासनाकडून उपाययोजनेची मागणी

लखमापूर : निफाड तालुक्यानंतर द्राक्ष उत्पादकांमध्ये दिंडोरी तालुक्याचे नाव पुढे येते; परंतु सध्या कोरोनामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांवर अस्मानी व सुलतानी संकटाने घाला घातल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतित झाला आहे.द्राक्षपंढरीवर वारंवार येत असलेल्या निसर्गाच्या कोपाने व अस्मानी व सुलतानी संकटाने निसर्गाच्या दुष्टचक्रापुढे द्राक्षपंढरी हतबल झाली असून, द्राक्ष शेती करणे दिवसेंदिवस अवघड व जिकिरीचे बनत चालले आहे. परकीय व नगदी चलन मिळवून देण्याच्या चवीने जागतिक बाजारपेठ काबीज केलेल्या जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या खर्चिक व महागड्या द्राक्ष पिकाला अवकळा आली आहे. द्राक्ष पिकांबरोबर इतर पिके घेणारा शेतकरी लॉकडाउनमुळे कचाट्यात सापडले आहेत. कोरोना व्हायरसमुळे जनजीवन ठप्पझाले असून, दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोनामुळे द्राक्ष विक्री व्यवसाय बंद झाल्यामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. शेतातच द्राक्ष असून, शेतकरी चिंतित आहेत. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, परमोरी, दहेगाव, वागळूद, ओझे, करंजवण,ओझरखेड, पुणेगाव, दहिवी, कोशिंबे, अवनखेड, कादवा म्हाळुंगी, म्हेळुस्के ही गावे द्राक्ष उत्पादनासाठी अग्रेसर आहेत; परंतु सद्यस्थितीला या गावातील द्राक्षबागा विक्र ीअभावी उभ्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे आज संपूर्ण देशात लॉकडाउन केल्यामुळे व शासनाने संचारबंदी लागू केल्यामुळे या मालाची विल्हेवाट लावायची कशी? या विवंचनेत द्राक्ष उत्पादक सापडले आहेत.स्थानिक व्यापारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोन्यासारख्या मालाला कवडीमोल दराने देऊन जे पदरी पडेल त्या भावाने द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष माल द्यायला तयार असून, द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक करून माल खरेदी करून बाहेर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र द्राक्षमालाच्या गाड्या अडविल्या जातात. त्यामुळे द्राक्ष व्यापाºयांनी द्राक्ष काढणी बंद केली आहे. या सर्वच गोष्टींमुळे शेतकरी वर्ग त्रस्त असून, बळीराजाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. या संकटातून बळीराजा कसा बाहेर येईल यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना आणून शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा ही मागणी जोर धरीत आहे.माल विकला गेला तरच चार पैसे हाती लागतील व आपल्यावर असलेल्या सोसायटी, बँक, पतसंस्था व अन्य ठिकाणांहून घेतलेले कर्ज फेडता येईल. तसेच घरात मंगल कार्य अथवा देणे-घेणे करता येईल या भरवशावर आज ना उद्या यातून मार्ग मिळेल, शासन आपल्याला मदत करेल याची या शाश्वती असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शासन यावर काय निर्णय घेते याचीच वाट बघत आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजार