ताहाराबाद ग्रामपंचायतीतर्फे औषध वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:46 IST2020-04-25T23:46:36+5:302020-04-25T23:46:49+5:30
मालेगावला कोरोनाच्या रुग्णांमध्ये झालेल्या वाढीमुळे ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना आजारपणावर मात करण्यासाठी औषधांचे वाटप करण्यात आले.

ताहाराबाद ग्रामपंचायतीतर्फे औषध वाटप
ताहाराबाद : मालेगावला कोरोनाच्या रुग्णांमध्ये झालेल्या वाढीमुळे ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना आजारपणावर मात करण्यासाठी औषधांचे वाटप करण्यात आले. गावातील अंगणवाडी व आशा सेविका यांच्याकडे बागलाण पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी हेमंतकुमार काथेपुरी, विस्तार अधिकारी व्ही. पी. जाधव यांच्या प्रमुख उपस्थित औषधीकिटचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणाऱ्या औषधात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, जुलाब, उलट्या आदी आजारांवर उपचारासाठी औषधे दिली जात आहेत. याप्रसंगी सरपंच इंदू सोनवणे, उपसरपंच डॉ. डी. एस. महाजन, माजी सरपंच सीताराम साळवे, माजी उपसरपंच प्रदीप कांकरिया, ग्रामपंचायत सदस्य वंदना नंदन, सुमनबाई कासारे, कारभारी गुंजाळ, जीवन माळी, डॉ. नितीन पवार, काशीनाथ नंदन, सचिन कोठावदे, पोपट घरटे, नीलेश कांकरिया, ग्रामविकास अधिकारी स्वप्निल ठोके, तात्याभाऊ कासार आदी उपस्थित होते. अंगणवाडी व आशा सेविका घरोघरी पोहोच करतील.