ग्रामपंचायत सदस्यास वैमनस्यातून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:23 IST2020-09-07T22:44:25+5:302020-09-08T01:23:27+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव-नांदडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश खातळे यांना राजकीय वैमनस्यातून खुन्नस धरून नांदडगाव येथील चौघांनी रस्त्यात अडवून लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत खातळे यांची चार तोळे सोन्याची चैन गहाळ झाली आहे.

ग्रामपंचायत सदस्यास वैमनस्यातून मारहाण
घोटी : इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव-नांदडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश खातळे यांना राजकीय वैमनस्यातून खुन्नस धरून नांदडगाव येथील चौघांनी रस्त्यात अडवून लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत खातळे यांची चार तोळे सोन्याची चैन गहाळ झाली आहे.
याबाबत घोटी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्टÑवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व नांदडगाव सांजेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश खातळे यांनी गावात विकासाची कामे हाती घेतली आहेत. मात्र गावातील राजकीय विरोधकांनी या विकासकामांना अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत उमेश जगन खातळे यांच्या फिर्यादीवरून घोटी पोलिसांनी पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजकीय धुसफूस
खातळे विकासकामांची पाहणी करण्यासाठी नांदडगाव येथे आले असताना मारुती मंदिराजवळ शंकर सदाशिव खातळे, योगेश सदाशिव, सदाशिव रामकृष्ण खातळे, गणेश सुरेश खातळे, संपत सुरेश खातळे या पाच जणांनी राजकीय वैमनस्यातून मारहाण केली. यावेळी झालेल्या झटापटीत चार तोळ्याची चैन गहाळ झाली. काही दिवसांपासून ही राजकीय धुसफूस सुरू आहे.