शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

विदर्भ व मराठवाड्यातील त्या १४ जिल्ह्यांना सवलतीच्या दरात धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 19:27 IST

राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट नसलेल्या १४ जिल्ह्यांतील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एप्रिल, मे आणि जून २०२० या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

ठळक मुद्देअन्न सुरक्षा नसलेल्या १४ जिल्ह्यांना सवलतीचे दरात धान्य केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नाशिक : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एप्रिल, मे आणि जून २०२० या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन घोषित करण्यात आला असून, या कालावधीत राज्यातील जनतेला मुबलक प्रमाणात व सवलतीच्या दरात अन्न, धान्य उपलब्ध व्हावे यासाठी सरकारकडून विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकºयांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ असे प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयानुसार औरंगाबादसह विभागातील जालना, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांना  अमरावतीसह विभागात वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासनाच्या दि.२४ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या या १४ जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना या योजनेद्वारे एप्रिल, मे आणि जून २०२० या तीन महिन्यांकरिता सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकfoodअन्नChagan Bhujbalछगन भुजबळMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ