मालेगावी जैन संगिनी ग्रुपचा पदग्रहण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:27 IST2018-03-22T23:27:34+5:302018-03-22T23:27:34+5:30
मालेगाव : येथील जैन संगिनी ग्रुपचा पदग्रहण सोहळा मराठा दरबारमध्ये पार पडला.

मालेगावी जैन संगिनी ग्रुपचा पदग्रहण सोहळा
मालेगाव : येथील जैन संगिनी ग्रुपचा पदग्रहण सोहळा मराठा दरबारमध्ये पार पडला. जैन संगिनी ग्रुपच्या अध्यक्षपदी स्मिता साखला यांची निवड झाली. त्यांना मांगीलाल कोठारी यांनी शपथ दिली. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, मामकोचे माजी चेअरमन राजेंद्र भोसले, चेअरपर्सन पंकजबेन वडेरा, सेक्रेटरी संगीता साकला, जैन संगिनी ग्रुपच्या माजी अध्यक्ष कविता कासलीवाल, पिंकी मेहता, ममता कासलीवाल उपस्थित होत्या. याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष स्मिता साखला यांनी भावी वाटचालीतील कामकाजाचा उल्लेख केला. त्यात त्यांनी पुढील वर्षभरात अपंग मुलांसाठी शाळा व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांना जेवणाची व्यवस्था करणे, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे अशा विविध सामाजिक कामांचा संकल्प केला.