शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा तत्त्वावरील मान्यता, नेमणुका द्या

By admin | Updated: July 30, 2014 00:19 IST

सहविचार सभा : मुख्याध्यापक संघाची मागणी

सिन्नर : शासनाने अनुकंपा तत्त्वावरील मान्यता व नेमणुका त्वरित द्याव्यात, अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी बी. एन. औताडे व जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेत या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले.या सहविचार सभेत जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने अनुकंपा तत्त्वावरील मान्यता व नेमणुका त्वरित द्याव्यात, संस्थाचालकांना तसे आदेश द्यावे व अनुकंपाच्या जागा त्वरित भरण्याची मागणी करण्यात आली. यासह वर्ष संपताच एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात कर्मचाऱ्यांना पी.एफ.च्या पावत्या अदा कराव्यात, डी.एड. ते बी.एड. स्केलच्या मान्यता संस्था देत नसेल तर शिक्षणाधिकारी पातळीवर देण्यात याव्या, सन २०१२ नंतरची राहिलेली मेडिकल बिले त्वरित काढावीत, तसेच नोव्हेंबर २००५ नंतर मान्यता मिळालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पी.एफ. खाते त्वरित सुरू करावे, शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर नियमित वेतनश्रेणी विनाअट लागू करावी, कर्मचाऱ्यांना विनाअट निवडश्रेणी द्यावी, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणाच्या सूचना भविष्यनिर्वाह निधी व वेतन पथकाला द्याव्यात आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या. या सहविचार सभेस मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष एस. बी. शिरसाठ, कार्यवाह एस. बी. देशमुख, सौ. ए. एस. टोणपे, के. के. अहिरे, आर. डी. निकम, के. एम. मोरे, एस. डी. शेलार, एस. के. सावंत, माणिक मढवई, एस. एन. बच्छाव, एस. ए. पाटील, के. डी. देवरे, बी. के. शेवाळे, बी. डी. गांगुर्डे, आर. टी. जाधव, योगेश पाटील, किशोर पालखेडकर, इरफान शेख आदिंसह मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)