शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

शासकीय आश्रमशाळांमध्ये होणार ‘सीक रूम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 2:03 AM

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आदिवासी आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये ‘सीक रूम’ तयार केला जाणार असून, विद्यार्थ्यांना लागलीच उपचार मिळणार आहे. ‘सीक रूम’ उपलब्ध आहे अशा आश्रमशाळांमध्ये औषधसाठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार : प्राथमिक उपचाराला मिळणार प्राधान्य

नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी आदिवासी आश्रमशाळा आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये ‘सीक रूम’ तयार केला जाणार असून, विद्यार्थ्यांना लागलीच उपचार मिळणार आहे. ‘सीक रूम’ उपलब्ध आहे अशा आश्रमशाळांमध्ये औषधसाठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.अतिदुर्गम भागात विद्यार्थ्यांना प्राथमिक वैद्यकीय सुविधादेखील मिळत नाही. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अंतर जास्त असल्याने विद्यार्थ्यांना तेथे नेणेही शक्य होत नाही. परिणामी आजारी विद्यार्थ्यांच्या जिवाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सीक रूम तयार करण्यात येऊन तेथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.‘सीक रूम’ सक्षम करण्यासाठी या ठिकाणी फर्निचर, वैद्यकीय उपकरणे, प्रथमोपचार पेटी, याबरोबरच पाणी, बाथरूम आणि बेडची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.सीक रूमचा प्राथमिक खर्च शासनाच्या आश्रमशाळा समूह योजनेतून करण्यात येणार असून, त्यानंतर खर्च दर महिन्यांसाठी लागणारी औषधे व वैद्यकीय उपकरणांच्या देखभालीचा खर्च शाळा व्यवस्थापन समितीच्या खर्चातून करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. याची जबाबदारी अधीक्षक आणि अधीक्षका यांची असणार आहे. त्यांच्यावर सीक रूमच्या सोयीसुविधांबरोबरच औषधांचा पुरवठा, कालबाह्ण औषधांची नोंदणी ठेवावी लागणार आहे. आदिवासी विकास विभागामार्फत ५०२ शासकीय आश्रमशाळा सुरू असून, सदर आश्रमशाळांमध्ये सुमारे १,९१,७२९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.प्रकल्प अधिकाऱ्यांचा वॉचअटल आरोग्य वाहिनीअंतर्गत ५३ शासकीय आश्रमशाळांमध्ये सीक रूमसाठी आवश्यक औषधे व उपकरणांचा पुरवठा शासनाकडून करण्यात येणार आहे. या सीक रूमवर तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयाची तसेच सहायक प्रकल्प अधिकारी यांची नजर असणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणHealthआरोग्य