ओझर येथे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 14:03 IST2020-01-08T14:02:58+5:302020-01-08T14:03:29+5:30
ओझर : विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारल्याने ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाºयांनी सहभाग नोंदवला.

ओझर येथे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप
ओझर : विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारल्याने ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाºयांनी सहभाग नोंदवला.बुधवारी ओझर बाजारपेठ बºयापैकी विश्रांती असते.त्यामुळे बाजारपेठेवर याचा तेवढा परिणाम झाला नसला तरी सरकारी कर्मचाºयांच्या कामबंद आंदोलनामुळे विविध कामासाठी ग्रामपालिकेत येणाºया सामान्य नागरिकांना माघारी फिरावे लागले. मंडळ अधिकारी,तलाठी कार्यालय यांच्या कार्यालयात शुकशुकाट होता.सकाळी ग्रामपालिका कार्यालयात ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकर यांनी ग्रामपालिका कर्मचाºयांच्या संपा बाबत विविध मागण्यांसंबंधी चर्चा केली.यावेळी आयटक चे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास शेलार,ओझर अध्यक्ष तुकाराम गवळी,सुभाष शेजवळ,सुधीर शिंदे,संदीप कमोद,सोमनाथ महाले, संतोष सोनवणे,योगेश गोरे, निलेश शेळके,अनिल रायते,दिलीप ठुबे, सतीश सोनवणे,जयंत गाडेकर,रु पेश उबाळे,सुनंदा गांगुर्डे,अनिल रायते,अिसफ पठाण,प्रवीण आहेर, कैलास जाधव यांच्यासह कर्मचारी संपात सहभागी झाले होते.वाढत्या आॅनलाइन वस्तू विक्र ीमुळे स्थानिक बाजारपेठेला फटका बसत असल्याने ओझरमधील सर्वच मोबाईल दुकानदारांनी शंभर टक्के पाळला.