शासनाने थेट कांदा खरेदी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:36 IST2020-07-03T22:36:36+5:302020-07-04T00:36:02+5:30
कांदा उत्पादन खर्चही निघत नसल्याने व कांदा कवडीमोल दराने विकला जात असल्याने शासनाने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार नितीन पवार यांच्याकडे करण्यात आली.

आमदार नितीन पवार यांना निवेदन देताना प्रदीप भदाणे, विलास रौंदळ, बाळासाहेब शेवाळे, राजेंद्र भामरे, संदीप पगार, ओंकार पाटील, कृष्णा जाधव, विनोद खैरनार आदी.
कळवण : कांदा उत्पादन खर्चही निघत नसल्याने व कांदा कवडीमोल दराने विकला जात असल्याने शासनाने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार नितीन पवार यांच्याकडे करण्यात आली.
शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन खर्च ११ ते १२ रु पये येत असून, कांदा आज ५ ते ६ रु पये दराने विकला जात आहे. यामुळे शेतकºयाचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. दर वाढल्यानंतर सरकार विदेशातून कांदा आयात करत दर पाडण्याचे काम करते. कांदा उत्पादकांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने २० रुपये दराप्रमाणे कांदा खरेदी करून शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भदाणे, तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, संदीप पगार, ओंकार पाटील, प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव, विनोद खैरनार, सुनील मोरे, संजय शेवाळे, लक्ष्मण रौंदळ, दादाजी जाधव आदी उपस्थित होते.