शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

शासकीय वसाहती पडल्या ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:15 IST

नाशिकरोड येथील गांधीनगर, नेहरूनगर तसेच डिस्टीलरी येथील महसूल कर्मचारी वसाहत आणि नाशिकरोड पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय वसाहतही सध्या ओस पडल्या आहेत.

नाशिक : नाशिकरोड येथील गांधीनगर, नेहरूनगर तसेच डिस्टीलरी येथील महसूल कर्मचारी वसाहत आणि नाशिकरोड पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय वसाहतही सध्या ओस पडल्या आहेत. केंद्रीय प्रेस कामगारांची घटलेली संख्या, पोलीस आणि शासकीय कार्यालयांचे झालेले विभाजन यामुळे कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वसाहतींचा वापर कमी झाल्याने या वसाहतही ओस पडल्या आणि कालांतराने भुरट्या चोरट्यांनी बंद वसाहतींमधील दरवाजे, खिडक्यांची चोरी केल्याने या वसाहतींनी अवकळा आली आहे.नेहरूनगर आणि गांधीनगर येथे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणारे छापखाने आहेत. गांधीनगर आणि नाशिकरोड येथे असलेल्या प्रेसमध्ये काम करणाºया कामगारांसाठी मोठी वसाहत उभारण्यात आली आहे. गांधीनगर येथे तीन ते चार हजार कर्मचारी राहू शकतील अशी शासकीय वसाहत आहे. नेहरूनगर येथे आठ ते दहा हजार कर्मचाºयांच्या निवासाची व्यवस्था होऊ शकेल अशी शासकीय वसाहत अनेक वर्षांपासून आहेत. त्याचप्रमाणे महसूल कर्मचाºयांसाठी आणि पोलीस कर्मचाºयांसाठीदेखील नाशिकरोडमध्ये वसाहती उभी होती.नाशिकरोड परिसर हा कामगार वसाहतीचा परिसर म्हणून मानला जातो. तीन ठिकाणी असलेले केंद्र सरकारचे छापखाने, एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कर्मचाºयांसाठी असलेली वसाहत, रेल्वे कर्मचारी, साखर कारखाना, पोलीस वसाहत, महापालिका कर्मचाºयांसाठी असलेल्या शासकीय वसाहती असल्यामुळे कामगार वसाहत म्हणून नाशिकरोडची ओळख सांगितली जात होती. परंतु कालौघात ही ओळख आता मागे पडली आहे.केंद्र आणि राज्य शासनाचे कर्मचारी कपातीचे धोरण, कारखान्यांमध्ये कमी झालेले काम, नव्याने कामगार भरती न करण्याचे धोरण यामुळे शासकीय कार्यालयांमधील कर्मचाºयांची संख्या कमी झाल्याने शासकीय वसाहतींचा वापरही कमी झाला आहे.परिणाम म्हणून या वसाहती ओस पडल्याने शासकीय निवासस्थानांचा वापर कमी झाला. कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने किरकोळ कर्मचारीच शासकीय वसाहतींमध्ये राहत असल्याने कमी कुटुंबांमध्ये विस्तीर्ण परिसरातील शासकीय निवासस्थानांमध्ये राहण्याबाबत कर्मचाºयांचीही मानसिकता नसल्यामुळे शासकीय सदनिकेमध्ये राहाण्याबाबत फारसे कुणी उत्सुकही दिसत नाही.शासकीय वसाहतींची देखभाल दुरूस्ती होत नसल्याने अशा ठिकाणी राहणे कर्मचाºयांना त्रासदायक वाटत असल्यामुळे कर्मचाºयांनी वसाहतींकडे पाठ फिरविली आहे.देखभाल-दुरूस्तीचेकाम झाले खर्चिकशासकीय कर्मचाºयांच्या निवासाची सोय म्हणून कर्मचारी कल्याण उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाºयांना राहण्याची व्यवस्था केली जाते. मोठे उत्पादन, कर्मचाºयांची मोठी संख्या आणि शिफ्टमध्ये चालणारे काम यामुळे शासकीय क्वॉर्टरमध्ये अस्तित्वात आले. परंतु कर्मचारी कपात झाल्यापासून शासकीय वसाहतही ओस पडू लागल्या. वसाहतीमध्ये राहणाºयांची संख्या कमी होऊ लागल्याने देखभाल दुरूस्तीचा खर्चही वाढू लागला. रिकाम्या सदनिकांवर अशाप्रकारचा खर्च करणे आर्थिक तोट्याचे ठरू लागल्याने कर्मचाºयांअभीव ओसाड झालेल्या वसाहती लवकर लयास गेल्या. कुणी राहाणारच नसेल तर दुरूस्ती का करायची म्हणून या सदनिका पडून राहिल्या आणि त्यामुळे त्यांची अधिक दुरवस्था झाली.चोरीच्या घटनांमुळे अधिकच बकाल स्वरूपबंद पडलेल्या शासकीय वसाहतींमधील दरवाजे आणि खिडक्या चोरट्यांनी चोरून नेसल्याने इमारतीचे केवळ सांगाडे शिल्लक राहिले आहेत. बांधकामामधील विटा, फरशादेखील चोरीस गेल्याने अशा इमारती दुरूस्ती करणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकHomeघर