शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

दारूबंदीसाठी महिलांची गावफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:24 PM

तळवाडे गावात आणि गाव परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याने ते व्यवसाय करणाºयांनी तत्काळ बंद करावेत, गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाºया मद्यपींनी दारू पिऊन गावात भांडणे करू नये. गावात, गल्लीत गोंधळ घालू नये अशी सक्त ताकीद आणि सज्जड दम तळवाडे येथील महिलांनी गावात जागृती फेरी मारून दिली.

सायखेडा : तळवाडे गावात आणि गाव परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याने ते व्यवसाय करणाºयांनी तत्काळ बंद करावेत, गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाºया मद्यपींनी दारू पिऊन गावात भांडणे करू नये. गावात, गल्लीत गोंधळ घालू नये अशी सक्त ताकीद आणि सज्जड दम तळवाडे येथील महिलांनी गावात जागृती फेरी मारून दिली. गावात अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्र ी सुरू आहे. गावातील तरुण पिढीला दारूचे व्यसन जडत आहे. अनेक वयस्कर माणसेदेखील दारूच्या नशेत असतात. कुटुंबात सतत वाद सुरू असल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर येऊ लागली आहेत, तर अनेक तरुण दारू पिऊन गाडी चालवित असल्याने आपघाताचे प्रमाण वाढत आहे.  अनेक वेळा गावात ग्रामसभा घेऊन दारूबंदीचे ठराव करण्यात आले. सायखेडा पोलीस ठाण्यात निवेदने देण्यात आली; मात्र दारू विक्री करणाºयांचे हात वरपर्यंत असल्याने दारूबंदी होत नसल्याची चर्चा सुरू आहे. गावातील महिला मात्र आता दारूबंदीसाठी पुढे सरसावल्या आहेत. गावात विशेष ग्रामसभा घेऊन पुन्हा एकदा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. गावातील महिलांनी संघटित होऊन गावात दारूबंदीसाठी फेरी मारली. दारू विक्री करणाºया व्यावसायिकांना सज्जड दम दिला आहे. गावात दारू पिऊन धिंगाणा घालणाºया मद्यपींना चोप देणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. गावातील महिला सरसावल्या असल्याने पुरुषांनी पुढे येऊन साथ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामसभेच्या ठरावाची प्रत ठाणे अंमलदार पेखळे यांना देण्यात आली आहे.गावात अवैध दारू विक्र ी सुरू असल्याने दिवसभर दारूड्यांचा सुळसुळाट गावात असतो. अनेक कुटुंबांमध्ये भांडणे होतात, त्यामुळे संसार उघड्यावर येत आहे, तरु ण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे दारू विक्र ी बंद करण्यात यावी अन्यथा महिला सामुदायिक हल्ला करतील.  - लता सांगळे, सरपंच, तळवाडे

टॅग्स :Nashikनाशिक