नाशिककरांना खूशखबर! मेट्रोला मंजुरी! नागरीकांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 01:37 PM2021-02-01T13:37:07+5:302021-02-01T13:40:36+5:30

नाशिक- केंद्रशासनाच्या अर्थंसकल्पात नाशिक मेट्रेासाठी २ कोटी ९२ कोटी रूपये मंजुर करण्यात आल्याने नाशिककरांमध्ये अत्यंत उत्साहाचेे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होईलच परंतु नाशिकचा विकास आता मेट्रोच्या वेगाने हेाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Good news to Nashik residents! Metro approved! Welcome from the citizens | नाशिककरांना खूशखबर! मेट्रोला मंजुरी! नागरीकांकडून स्वागत

नाशिककरांना खूशखबर! मेट्रोला मंजुरी! नागरीकांकडून स्वागत

Next
ठळक मुद्देटायबेस्ड मेट्रोफडणवीस यांनी केले अभिनंदन महापौर म्हणतात ही दत्तक नाशिकला भेट

नाशिक- केंद्रशासनाच्या अर्थंसकल्पात नाशिक मेट्रेासाठी २ हजार कोटी ९२ कोटी रूपये मंजुर करण्यात आल्याने नाशिककरांमध्ये अत्यंत उत्साहाचेे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होईलच परंतु नाशिकचा विकास आता मेट्रोच्या वेगाने हेाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यात नाशिककरांसाठी निओ मेट्रो मंजुर दिली आहे. त्यामुळे नाशिककरांना सुखद धक्का बसला आहे. महाराष्ट्रात नाशिक आणि नागपुर अशा दोन्ही शहरांसाठी मेट्रो मंजुर आहेत. नागपुर मध्ये अगोदरच मेट्रो असल्याने त्यांच्यापेक्षा नाशिककरांना मध्ये या मेट्रेाविषयी विशेष उत्सूकता आहे. नाशिक शहरातील निओ मेट्रो हा देशातील पहिला अत्यंत कमी खर्चाचा आणि प्रदुषण रहीत टायर बेस्ड मेट्रो प्रकल्प आहे. नाशिक शहरातील शिवाजी नगर (सातपुर) ते नाशिकरोड अशा २२ किमी मार्गाचा मार्ग असून असून पूर्वक मार्गिका देखील आहेत. राज्यात फडणवीस सरकार असताना नाशिकमध्ये विभागीय आयुक्तालयात या प्रकल्पाची घाेषणा केली हेाती.

राज्यातील सरकार बदललल्यानंतर याविषयी शंका व्यक्त केली जात असली तरी  विद्यमान ठाकरे सरकारने देखील केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला हेाता. नाशिकमध्ये महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा सुरू होत आहे. त्यानंतर आता मेट्रोच्या माध्यमातून सेवा सार्वजनक वाहतूक सुरू होत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर नागपूर आणि नाशिककरांचे अभिनंदन केले आहे. तर नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्यानंतर नाशिककरांना काय दिले, हे विचारणाऱ्यांना हे मिळालेले उत्तर आहे. या निर्णयामुळे नाशिकचा विकास आता मेट्रो इतक्याच वेगाने हाईल, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

Web Title: Good news to Nashik residents! Metro approved! Welcome from the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.