शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अच्छे दिन असलेल्या भाजपला बुरे दिनची भीती!

By संजय पाठक | Published: November 02, 2019 6:10 PM

कोणत्याही यशाला अनेक दावेदार असतात. प्रभावाचा धनी मात्र कोणी होण्यास तयार नसते. नाशिकमध्ये यशापयशाचे मूल्यमापन अद्याप व्हायचे आहे, पण तत्पूर्वी भाजप नेते आणि माजी आरोग्य मंत्री (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून भाजपत काम करणाऱ्यांनी जी वस्तुस्थिती मांडली

ठळक मुद्दे* जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांची भीती योग्य* विधानसभा निवडणुकीत कष्टसाध्य यश* पक्ष संघटनेकडे होतेय दुर्लक्ष

संजय पाठकनाशिक : राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाची गाडी सुसाट जाईल, असे मानले जात असताना प्रत्यक्षात तसे झाले नाही. नाशिक पुरताच विचार करायचा तर आत्तापर्यंतचे सर्वात मोठे यश म्हणजे १५ पैकी ५ जागा मिळाल्या खऱ्या, परंतु त्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्यातून हा पक्ष जमिनीवर आला असं म्हणावं लागेल. विशेषत: मूळ भाजपेयींनी त्यावर खल केला ही सकारात्मक बाजू मानवी लागेल!कोणत्याही यशाला अनेक दावेदार असतात. प्रभावाचा धनी मात्र कोणी होण्यास तयार नसते. नाशिकमध्ये यशापयशाचे मूल्यमापन अद्याप व्हायचे आहे, पण तत्पूर्वी भाजप नेते आणि माजी आरोग्य मंत्री (कै.) डॉ. दौलतराव आहेर यांच्या जयंतीनिमित्त भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून भाजपत काम करणाऱ्यांनी जी वस्तुस्थिती मांडली ती दुर्लक्ष करण्यासारखी नाहीच, परंतु आता पक्षाला अच्छे दिन आल्याचा आभास असल्याचे स्पष्ट करणारी ठरली आहे.यंदा भाजपला विधानसभा निवडणुकीत १५ पैकी ५ जागा मिळाल्याने आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. भाजपने १९९९ पर्यंत विधानसभा निवडणुकीत तीन जागा मिळवण्यापलीकडे मजल मारली नव्हती. १९९९ मध्ये भाजपला ४ जागा मिळाल्या होत्या. यंदा त्या ५ झाल्या आहेत, मात्र बागलाण वगळता सर्वच जागा मिळवताना दमछाक झाली. देवळा, चांदवडमध्ये आमदार डॉ. राहुल आहेर यांची दमछाक झाली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तेथे सभा घेताना डॉ. आहेर यांना निवडून दिल्यास मंत्रिपद देऊ असे जाहीर करावे लागले. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारल्याने लगोलग पक्षाने आजवर सत्तापदांची बरसात केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन भाजपला आव्हान देणारे बाळासाहेब सानप अडचणीचे ठरले आणि पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली. कसेबसे तेथे यश मिळाले. नाशिक पश्चिममध्ये मित्रपक्ष शिवसेनेचे बंड आणि भाजपमधील फितूर असे आव्हान कसे बसे पेलले गेले. मध्य नाशिकमध्ये सुरुवातीला आमदार देवयानी फरांदे यांचा एकतर्फी वाटणारा विजय नंतर तसा वाटला नाही. कोणत्याही पूर्वतयारीशिवाय मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाच्या डॉ. हेमलता पाटील यांनी ४५ हजार मते मिळवली आणि मनसेच्या नितीन भोसले यांनी २२ हजार मते मिळवली. म्हणजे एकास एक विरोधी उमेदवार दिला असता तर भाजपला निवडणूक कठीण गेली असती. फरांदे यांनी गेल्या निवडणुकीत जो लीड मिळवला तेवढाच साधारणत: यंदाही कायम ठेवला. कथितरीत्या एकतर्फी निवडणूक असूनही तसे मताधिक्यात दिसले नाही.असं का घडलं ? याची अनेक कारणे आहेत, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्तेच्या तुलनेत पक्षाला दिले गेलेले दुय्यमस्थान! २०१४ मध्ये राज्यात सत्ता आली. नाशिक शहरात ४ पैकी तीन जागा मिळाल्या. त्यानंतर नाशिक महापालिकेत अभूतपूर्व यश मिळाले. मनपाच्या इतिहासात प्रथमच ६६ उमेदवार विजयी झाल्याने पाशवी बहुमत मिळाले. त्यामुळे सत्ता म्हणजे सर्वस्व अशी स्थिती झाली. संघटनेत पदे खिरापतीसाठी वाटली, परंतु त्याचे गांभीर्य नाही. साप्ताहिक बैठका, मासिक बैठका सर्व काही बंद. पूर्वी कोणत्याही राष्ट्रपुरुष किंवा नेत्याची जयंती, पुण्यतिथी असो नगरसेवक आणि पदाधिकारी सर्व हजर असत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. २०१४ मध्ये भाजपचे शहरातच तीन आमदार निवडून आले. २०१७ मध्ये नाशिक महापालिकेत अभूतपूर्व यश मिळाले आणि ६६ नगरसेवक निवडून आले त्यात मूळ भाजपचे अवघे १० ते १५ नगरसेवक बाकी सर्व आयराम! पक्ष माहीत नाही पक्षाचे नियम आणि शिस्त माहीत नाही मग काय होणार? बरे तर आयारामांना नसेल माहिती शिस्त, मग ती शिकवायची कोणी? सत्तेच्या मदात सारेच धुंद झाल्याने संघटनेकडे दुर्लक्ष होत गेले. संघटनेला दुय्यम स्थान मिळाले. पक्षाच्या निष्ठेपोटी असलेल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले आयारामांना मनाचे पान मिळू लागले. अस्सल कार्यकर्ते दूर होऊन पेड कार्यकर्ते वाढले. या सर्वांचाच परिपाक म्हणून निवडणुका खडतर ठरल्या.विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतरही विजय साने, योगेश हिरे, बाळासाहेब पाटील, गणेश कांबळे या जुन्या नेत्या कार्यकर्त्यांनी वेळीच पक्षाला भान आणून दिले हे चांगलेच झाले. आता त्यावर किती गांभीर्याने अंमलबजावणी होते ते महत्त्वाचे आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपा