शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा कोटीचा शर्ट घालणारा गोल्डमॅन अटकेत, २२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 20:14 IST

नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका फ्लॅटमधून पारख यांना अटक केली.

नाशिक - जिल्ह्यातील येवला येथील एक गोल्डमॅन काही वर्षांपूर्वीच चांगलेच चर्चेत आले होते. पंकज पारख यांनी ४ किलो पेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा शर्ट बनवून पुण्यातील फुगे यांचे रेकॉर्ड ब्रेकच केले नव्हते तर गिनीज बुकातही स्वतःच्या नावाची नोंद केली. त्यामुळे, तब्बल सव्वा कोटींचा शर्ट परिधान करणारा हा गोल्डमॅन चांगलाच चर्चेत होता. आता, पंकज पारख यांना एका घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. पंकज पारिख संचालक असलेल्या पतसंस्थेमध्ये 22 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी पंकज पारख यांना अटक केली आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका फ्लॅटमधून पारख यांना अटक केली. पंकज पारख, चेअरमन योगेश सोनी, व्यवस्थापक अजय जैन आणि संचालक मंडळाच्या विरोधात सहायक निबंधक प्रताप पाडवी यांनी तक्रार दिली होती. येवला येथील कै.सुभाषचंद्र पारख पतसंस्थेच्या 17 संचालक मंडळावर 21 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप बँकेचे प्रशासक व सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांनी केला आहे. दरम्यान, पुढील तपासासाठी पारख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घेऊन गेले असून शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कोण आहेत पंकज पारिख

नाशिकच्या येवला भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष व उपमहापौर असलेले पारिख व्यावसायिक आहेत. त्यांनी १० किलो वजनाचा सोन्याचा शर्ट बनवून घेतला आहे व जगातील सर्वाधिक महागडा शर्ट अशी नोंद गिनीज बुकमध्ये केली आहे. पारिख हा शर्ट घालतात तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी सहा बॉडीगार्ड असतात. या शर्टचे डिझाईन त्यांनी दुबईतून बनवून घेतले व नाशिकच्या बाफना सराफांनी तो बनविला. त्यासाठी १९ कारागिर दोन महिने काम करत होते. या शर्टबरोबरच पारिख सोन्याच्या भल्या जाडजूड चेन्स, सोन्याचे घड्याळ, सोन्याची चष्मा फ्रेम, सोन्याचे मोबाईल कव्हर अशा अ‍ॅक्सेसरीजही वापरतात. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस