शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कांद्याच्या रोपाला सोन्याचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 5:58 PM

खामखेडा : परतीच्या व अवकाळी पावसाने उन्हाळी कांद्याचे रोपाचे नुकसान झाल्याने कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव आला आहे.

ठळक मुद्देखामखेडा : मागणी अधिक वाढल्याने रोपांचा तुटवडा

खामखेडा : परतीच्या व अवकाळी पावसाने उन्हाळी कांद्याचे रोपाचे नुकसान झाल्याने कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव आला आहे.या वर्षी उन्हाळी कांद्याला चांगल्यापैकी भाव असल्याने शेतकऱ्याने सप्टेंबर महिन्यात उन्हाळी व रांगडा कांद्याचे बियाणे टाकले होते. काही रोपे उगविली होती. तर काही नुकतेच टाकलेले होते. कांद्याचे रोप चांगल्यापैकी उगविले होते. परंतु आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने एवढ्या मोठ्या जोरदार हजेरी लावली कि या पाऊसामुळे जे काही कांद्याचे बियाणे टाकली होती. ती या जोरदार पाऊसामुळे जागीच दाबली गेली. आणि जी काही उतरली होती, ती कोळी असल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ती या पावसामुळे समाप्त झाली.तेव्हा शेतकºयाने पुन्हा नवीन जमीन तयार करून दुबार जवळ शिल्लक असले उन्हाळी व रांगडा कांद्याचे बियाणे टाकली. परंतु पुन्हा पंधरा दिवसांनी अवकाळी पावसाने सतत पंधरा दिवस जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पाणी सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने कांद्याच्या रोपाच्या वाफ्यात पाणी साचल्याने कांद्याच्या रोपे पाण्यात सडून गेली. तेव्हा कांद्याचे रोपे शिल्लक राहिले नाही.आता उन्हाळी कांद्याने बारा हजाराचा टप्पा फार केला असला तरी आता शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांदा शिल्लक नाही. अगदी बोटावर मोजता येणाºया अगदी तुरळक शेतकºयांकडे जास्त नाही. पण पाच दहा क्विंटल कांदा शिल्लक आहे. लाल कांदाही जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात निघू लागला आहे. त्यालाही चार हजार पासून ते आठ हजार पर्यत भाव मिळत आहे. परंतु तो अगदी कमी प्रमाणात लाल कांदा कमी प्रमाणात आहे.काही शेतकºयांनी पाऊस उघडल्यानंतर रांगडा कांद्याचे बियाणे टाकले आहेत. रांगडा कांदा हा उन्हाळी कांद्याच्या आधी तयार होतो. आणि तो एकलाट तयार होऊन काढणीस येतो. त्याचे उत्पादनही लाल पोळ कांद्यापेक्षा जास्त प्रमाण निघते. तेव्हा सध्याचा कांद्याचे मिळणार भाव पाहून रंगडा कांद्याचे रोप मिळेल आणि निदान रंगडा कांद्याला पुढे थोडाफार भाव मिळे ज्या काही शेतकºयांनी कांद्याचे रोपे लागवड करीत आहेत. आणि काही शेतकºयांची लागवड होऊन जास्त नाही पण थोडीच रोप शिल्लक आहे.ज्या शेतकरयांनी आठ हजार रु पये पायली बियाणे विकत घेऊन टाकली आहेत. त्याची किंमत आज एक पायली टाकलेल्या कांद्याच्या रोपांची किंमत तबल २५ ते ३० हजार रु पयांवर गेली आहे. परंतु तीही मिळत नाही. त्यामुळे एका वाफ्याची किंमत दोन ते तीन हजार रु पये किंमत होत आहे. लागवड झाली तर पुढे निदान कांद्याला भाव मिळेल या आशेने रोप कोठे मिळते का म्हणून फिरतांना दिसून येत आहे. तर कांद्याच्या रोपांना सोन्याचा भाव आला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा