पेठच्या रोहिणीला कराटेमध्ये सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 13:16 IST2020-01-10T13:15:53+5:302020-01-10T13:16:01+5:30
पेठ -तालुक्यातील उम्रद या अतिदुर्गम पाडयावरील रोहिणी संजय दुगल या कराटेपटूने नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धत सुवर्णपदक पटकावले.

पेठच्या रोहिणीला कराटेमध्ये सुवर्णपदक
पेठ -तालुक्यातील उम्रद या अतिदुर्गम पाडयावरील रोहिणी संजय दुगल या कराटेपटूने नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धत सुवर्णपदक पटकावले. युथ गेम्स फेडरेशन आयोजित युथ गेम्स इंटरनॅशनल प्रो- लीग चॅम्पियनशीप स्पर्धा २०२० नेपाळ येथे घेण्यात आल्या. त्यामध्ये रोहीणी दुगल हिने १४ वर्षाखालील वयोगटात कराटे स्पर्धत उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्ण पदक पटकावले. रोहिणीचे गुरु वारी नाशिक येथे आगमन झाले. शासकिय कन्या विद्यालय येथे पंचायत समिती शिक्षण विभाग पेठ व आपली आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने तिचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, खंडेराव डावरे, ज्ञानेश्वर सोमासे, संजय दुगल, अरु ण बेलदार यांचे सह शिक्षक उपस्थित होते. रोहिणीच्या पुढील सरावासाठी पेठ शिक्षकांनी वर्गणी करून आर्थिक मदत सुपूर्द केली.