Video : गोदावरीला पूर; दुतोंड्या मारुती मानेपर्यंत बुडाला, सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 02:15 PM2021-09-29T14:15:41+5:302021-09-29T14:58:22+5:30

गोदावरीच्या पात्रात गंगापूर धरणातून बुधवारी सकाळी आठ वाजता ५ हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. तासाभराने हा विसर्ग ७हजार क्युसेकपर्यंत वाढविला गेला आणि पुन्हा दोन तासांनी दहा वाजता तीन हजाराने वाढ करत गंगापूर धरणाचा विसर्ग १० हजार करण्यात आला. दुपारी बारा वाजेपर्यंत धरणातून पुन्हा ५२१क्युसेकची वाढ केली गेल्याने १० हजार ५३१क्युसेक इतका विसर्ग गोदावरीत दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु होता.

Godavari floods; Large discharge from Gangapur dam | Video : गोदावरीला पूर; दुतोंड्या मारुती मानेपर्यंत बुडाला, सतर्कतेचा इशारा

Video : गोदावरीला पूर; दुतोंड्या मारुती मानेपर्यंत बुडाला, सतर्कतेचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देदुतोंड्या मारुती मानेपर्यंत बुडाला साडेदहा हजार क्युसेक पाणी गोदापात्रात

नाशिक : शहर व परिसरात सकाळापासून हलक्या-मध्यम सरींची संततधार सुरु असली तरी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मागील २४ तासांत शहरात ३९.४ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. तसेच गंगापुर धरणाच्या पाणलोटक्षेत्रातसुध्दा पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने गंगापुर धरण शंभर टक्के भरल्याने बुधवारी (दि.२९) सकाळपासून टप्प्याटप्प्याने विसर्गाला सुरुवात करण्यात आली. दुपारी बारा वाजेपर्यंत १० हजार ५३१क्युसेक इतका विसर्ग गोदावरीत करण्यात आल्याने गोदामाई सलग दुसऱ्या आठवड्यात दुथडी भरुन वाहताना नाशिककरांच्या नजरेस पडली. पूर तीव्रतेचे पारंपरिक मापक मानल्या जाणाऱ्या गोदापात्रातील दुतोंड्या मारुतीची मुर्ती मानेपर्यंत बुडाली. जिल्हाधिकारी यांनी गोदाकाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गोदावरीच्या पात्रात गंगापूर धरणातून बुधवारी सकाळी आठ वाजता ५ हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. तासाभराने हा विसर्ग ७हजार क्युसेकपर्यंत वाढविला गेला आणि पुन्हा दोन तासांनी दहा वाजता तीन हजाराने वाढ करत गंगापूर धरणाचा विसर्ग १० हजार करण्यात आला. दुपारी बारा वाजेपर्यंत धरणातून पुन्हा ५२१क्युसेकची वाढ केली गेल्याने १० हजार ५३१क्युसेक इतका विसर्ग गोदावरीत दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु होता.

शहरातील अहल्यादेवी होळकर पुलाखालून दुपारी १३ हजार क्युसेक इतका विसर्ग पुढे रामकुंडातून तपोवनाच्या दिशेने प्रवाहित झाले आहे. दुपारपर्यंत गंगापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान कमी झाले होते. संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढल्यास विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे. गोदाकाठावर अतीसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रामसेतू पुलाला पूराचे पाणी लागले आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून बुधवारी दूपारपर्यंत ४५ हजार ८२क्युसेक इतके पाणी जायकवाडीच्या दिशेने प्रवाहित आहे. यामुळे जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ होऊन जायकवाडीमधूनही विसर्ग वाढू शकतो.

Read in English

Web Title: Godavari floods; Large discharge from Gangapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.