गोदाकाठाला मुसळधार पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:49 IST2020-07-29T22:31:08+5:302020-07-30T01:49:42+5:30
चांदोरी : गोदाकाठ परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या झालेल्या पावसाने शेतकरीराजा सुखावला आहे. गोदाकाठ भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतात पाणी साचले आहे.

गोदाकाठाला मुसळधार पावसाने झोडपले
ठळक मुद्देपाऊस जवळपास पंधरा दिवसापासून दडी मारून बसला होता
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदोरी : गोदाकाठ परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या झालेल्या पावसाने शेतकरीराजा सुखावला आहे. गोदाकाठ भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतात पाणी साचले आहे.
जवळपास सलग दोन तास पावसाने जोरदार हजेरी लावले. तसेच नदी, नाले तुडुंब झाले आहे. यामुळे खरीप पिकांना हा पाऊस संजीवनी म्हणून आला असल्याने मत शेतकरी व्यक्त करत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला व मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती, मात्र त्या नंतर पाऊस जवळपास पंधरा दिवसापासून दडी मारून बसला होता तर कधी रिमझिम पाऊस होता.