God damn who killed him ... | देव तारी त्याला कोण मारी...
देव तारी त्याला कोण मारी...

सायखेडा : गाडीचे टायर फुटल्याने पुलावरून खाली कोसळणारी गाडी बॅरिगेटला अडकल्याने मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.  ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास येवल्याहून मुंबईकडे जाणारे एक वाहन रस्ता चुकते आणि ते पश्चिमेकडे न जाता पूर्वेकडे भरघाव वेगाने दोन किलोमीटर अंतरावर येते. सायखेडा नाशिक महामार्गावरील गोदावरी नदीच्या पत्रावर असणाऱ्या पुलावर येते. अचानक वाहनाचे टायर फुटते, गाडी पुलावरून कोसळणार तोच पुलाच्या कडेला असलेल्या बॅरिगेटला अडकते. अर्धी गाडी पुलावर तर अर्धी गाडी पुलाच्या खालील बाजूस तरंगते. मात्र सुदैवाने सर्वजण जागे असल्याने मागील शिटवरून खाली उतरल्याने जीवित हानी टळते असा रोमांचकारी प्रसंग बुधवारी रात्री घडला.  एमएच ०४, डीडब्ल्यू २८६२ ही इनोव्हा कार येवल्याहुन मुंबईकडे जात असताना रस्ता चुकल्या कारणाने सायखेडा पुलावरती गाडीचे टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. सुदैवाने पुलाच्या बाजूला मजबूत बॅरिकेट्स असल्याने गाडी पाण्यात पडण्यापासून वाचली. गाडीमध्ये एक ४५ वर्षीय महिला व चार प्रवाशी होते. ही घटना बघताच शुभम गारे यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती चांदोरीचे अध्यक्ष सागर गडाख ,सुरजकुमार पगारे, ,सचिन कांबळे,फिकरा धुळे ,बाळू आंबेकर , आकाश शेटे ,विकी पगारे हे सर्वजण घटनास्थळी तात्काळ पोहचले व
काही वेळानंतर सायखेडा पोलीस स्टेशनला कळविण्यात आले व कॉन्स्टेबल सोनवणे , व बांगर घटनास्थळी उपस्थित झाले. झालेली गर्दी आटोक्यात आणली .जखमी झालेल्या रु ग्णांना रु ग्णालयात दाखल करण्यात आले . सुदैवानेमोठा अपघात टळला.

Web Title:  God damn who killed him ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.